नोकरदारांसाठी महत्वाची बातमी ! लवकरच निवृत्ती संदर्भात महायुती सरकार मोठा निर्णय घेणार ?

 

प्रेस मीडिया लाईव्ह : 

 सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. जे नागरिक सरकारी नोकरी करत आहेत त्यांच्यासाठी सरकार एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. येत्या काळात सरकारी नोकरदारांच्या निवृत्तीच्या वयात बदल होऊ शकतात असे संकेत सध्या सरकारने दिले आहेत. 

सरकारी सेवेत असणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून प्रशासनाला अधिक सहकार्य मिळावं या हेतूनं राज्य शासनाच्यावतीने सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तिचं वय 60 वर्षं करण्याबाबत सरकार सरकारात्मक विचार करत आहेत. 

 सध्या राज्यात निवडणूक आचारसंहिता संपली असून, येत्या काळात यासंदर्भातील निर्णय घेतला जाईल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकारी कर्मचारी संघटनेला सांगितलं आहे.

Post a Comment

Previous Post Next Post