प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी : दि.२९ जून २०२४ रोजी इचलकरंजी महानगर पालिकेच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त महानगर पालिकेच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करणेत आले होते. यामध्ये प्रामुख्याने अधिकारी कर्मचारी यांचा विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम आणि गावभाग प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य शिबीराचा समावेश करणेत आलेला होता.
कार्यक्रमाचा शुभारंभ आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे, उपायुक्त प्रसाद काटकर, उपायुक्त स्मृती पाटील, उपायुक्त सोमनाथ आढाव यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून करणेत आले.
तदनंतर कामगार कल्याण मंडळाच्या वतीने आयुक्त, उपायुक्त यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करणेत आले. आयुक्त यांच्या सुचनेनुसार या वेळी उपस्थित सर्व अधिकारी कर्मचारी यांनी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध रहाणेची सामुहिक शपथ घेतली.
विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमात आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे,सौ.निलीमा दिवटे यांचेसह उपायुक्त प्रसाद काटकर, उपायुक्त स्मृती पाटील, उपायुक्त सोमनाथ आढाव, मुख्य लेखा व वित्त अधिकारी विकास खोळपे यांनी सहभाग घेवून सर्व अधिकारी कर्मचारी यांचा उत्साह वाढविला.
आजच्या कार्यक्रमात दिलीप हराळे, धनंजय पळसुले, दिपक खोत,सुनील बेलेकर, नितिन बनगे,वरुन चुनारी, पियुष लालबेग, सदाशिव शिंदे, खेमचंद लालबेग, युवराज भोसले, हरीश कांबळे, नवनाथ जाधव, गणेश शिंदे,शाख्यानंद कांबळे, शांतिनाथ जगताप,अनिस पठाण, उमेश कांबळे, अमोल कुलकर्णी, संजय कांबळे, तानाजी कांबळे,खदिजा सनदी, रामचंद्र कांबळे,किशोर खोत, अमोल कांबळे,शुभांगी जोशी, राजश्री कोरगांवकर, ज्योती साठे,आकाश पाटील, महेश सोनवणे, संदेश नाईक,शिवाजी जोगळेकर , नितिन गुलफागे, संदीप कांबळे आदी अधिकारी कर्मचारी यांनी सहभाग घेतला होता.
यावेळी सहा.आयुक्त केतन गुजर, विजय राजापुरे, मुख्य लेखा परीक्षक आरती खोत,प्रा.ए.बी. पाटील, शिवाजी जगताप, के.के. कांबळे, शंकर अगसर, संजय शेटे आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी निवेदन सौ.सिमा मुळे यांनी केले तर सुरदास सिंगींग स्टुडिओचे अरुण साळोखे यांचे विशेष सहकार्य लाभले.