प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी ता.१८ 'वैज्ञानिक समाजवादाचे खुले ज्ञानपीठ ' हे ब्रीद घेऊन लोकप्रबोधनाचे सातत्यपूर्ण काम करणारी समाजवादी प्रबोधिनी दोन वर्षानी सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण करणार आहे. आगामी दोन वर्षांमध्ये समाजवादी प्रबोधिनीचे काम अधिक गतिशील ,व्यापक आणि सर्वार्थाने मजबूत पद्धतीने केले जाईल. तसेच भारतीय राज्यघटनेच्या अमृत महोत्सवी वर्षात विशेष उपक्रम राबवले जातील.प्रबोधन ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असून आर्थिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक अशा सर्व क्षेत्रांमध्ये प्रबोधनाची सातत्यपूर्ण गरज असते ते काम प्रबोधिनी संघटितपणे करत आहे. ३१ हजारावर पुस्तके आणि शंभरावर नियतकालिकांनी समृद्ध असलेल्या प्रबोधन वाचनालया पासून गेली ३५ वर्षे नियमित प्रकाशित होत असलेल्या 'प्रबोधन प्रकाशन ज्योती 'या मासिका पर्यंतचे सर्व उपक्रम अधिक गतिशील करण्यासाठी अधिक सक्रियतेने सामूहिकरीत्या प्रबोधिनी कार्यरत राहील.त्याला समाजातील सर्व घटकांनी व्यापक साथ द्यावी असे आवाहन समाजवादी प्रबोधिनीच्या सत्ते चाळीसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत कऱण्यात आले.या सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष ज्येष्ठ विचारवंत प्रा.डॉ.अशोक चौसाळकर होते. मंचावर प्रसाद कुलकर्णी, प्राचार्य डॉ.टी.एस.पाटील ,जयकुमार कोले उपस्थीत होते.
समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद कुलकर्णी यांनी स्वागत व प्रास्ताविक आणि विषय पत्रिकेचे वाचन केले. या सर्व विषयांवर चर्चा होऊन सर्व विषय मंजूर करण्यात आले. या चर्चेमध्ये प्राचार्य डॉ. टी. एस. पाटील, प्रा. शिवाजीराव होडगे,जयकुमार कोले,डॉ.एस. के.माने , प्रा.समीर कटके ,प्रा.डॉ. काशिनाथ तनंगे, प्रा. विजयकुमार जोखे , बी.एस.खामकर ,प्रा. रमेश लवटे ,डॉ.संजय साठे ,रवी जाधव आदींनी सहभाग घेतला.या सभेत डॉ.अशोक चौसाळकर यांचा अमृत महोत्सवानिमित्त आणि प्रसाद कुलकर्णी ,शशांक बावचकर,प्रा.शिवाजीराव होडगे, प्रा. डॉ.काशिनाथ तनंगे यांचा विविध पुरस्कार व निवडीबद्दल सत्कार करण्यात आला. प्रारंभी अहवाल वर्षात कालवश झालेल्या सर्वाना आदरांजली वाहण्यात आली.
या बैठकीत २०२४ ते २०२७ या तीन वर्षासाठी समाजवादी प्रबोधिनीच्या मध्यवर्ती कार्यकारिणीची पुढील प्रमाणे निवड करण्यात आली. प्रा.डॉ. अशोक चौसाळकर (अध्यक्ष) प्रा. डॉ. भारती पाटील ( उपाध्यक्ष )प्रसाद माधव कुलकर्णी ( सरचिटणीस) प्राचार्य डॉ. टी.एस. पाटील (सहचिटणीस )शशांक बावचकर ( खजिनदार),डॉ. चिदानंद आवळेकर ,प्राचार्य आनंद मेणसे,राहुल खंजिरे , अन्वर पटेल ( सदस्य), प्रा. विजयकुमार जोखे, बी.एस.खामकर, प्राचार्य डॉ.सुनील हेळकर, प्रा. डॉ.काशिनाथ तनंगे (निमंत्रित). या नव्या निवडीबद्दल सर्वांचे अभिनंदन करण्यात आले आणि शुभेच्छा देण्यात आले.
या सभेस दशरथ पारेकर, प्रा. डॉ. भालबा विभुते, प्रा.अनिल उंदरे ,साताप्पा कांबळे, आप्पासाहेब कमलाकर, बबन बारदेस्कर ,सिकंदर जमादार ,सतीश कांबळे, के.एस.दानवाडे , प्रा. आप्पासाहेब कमलाकर, प्रा. साताप्पा कांबळे,, संजय संकपाळ सौदामिनी कुलकर्णी, पांडूरंग पिसे,मनोहर कांबळे, अजित मिणेकर, शकील मुल्ला ,शहाजी धस्ते, मनोहर जोशी, धुळगोंडा पाटील, बाळासाहेब कदम, सुभाष सुतार ,रणजीत चाफेकर,एस. टी.पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. ही वार्षिक सर्वसाधारण सभा अत्यंत खेळीमेळीच्या उत्साहाच्या वातावरणात पार पडली.अन्वर पटेल यांनी आभार मानले.
फोटो : वार्षिक सभेत प्रा. डॉ. अशोक चौसाळकर यांचा अमृत महोत्सवानिमित्त जयकुमार कोले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.