प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी : प्रतिनिधी
इचलकरंजी येथे बँक ऑफ इंडियातर्फे वरिष्ठ उदयोजक व चार्टर्ड अकाउंटंटस यांचा मेळावा नुकताच संपन्न झाला.
इचलकरंजी शहरातील व्यवसायाचा वाढता आलेख पाहता कर्ज पुरवठ्याशी संबंधीत शंकांचे तात्काळ निराकरण , सुलभ कर्ज प्रक्रियेसाठी बँकेने जुलै 2023 साली इचलकरंजी येथे एसएमई अर्बन सिटी सेंटर तसेच रिटेल बिजनेस सेंटर लोकसेवार्थ सुरु केले होते. या उपक्रमाला ग्राहकांकडून भरघोस प्रतिसाद मिळाला. दोन्ही सेंटर्सच्या दैदिप्यमान यशाच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा आयोजित करण्यात आला होता.
यावेळी बँकेचे विभागीय प्रमुख राजीवकुमार सिंग यांनी उद्योजकांच्या अर्थसहाय्य संदर्भात सर्व अडचणींचे निराकरण करण्यासाठी बँक व्यवस्थापन कटीबद्ध राहील,अशी ग्वाही दिली.
या मेळाव्यास अनिल गोयल, सतीश जठार, आशिष सोनथालिया, प्रदीप केसरे, आनंद भराडिया, रवी रांधार, राजीव अरोरा, अनिल मंत्री, संदीप बडवे यांच्यासह उदयोजक चार्टर्ड अकाउंटंट तसेच बँकेचे प्रतिनिधी ज्योतीकुमार सिंग, राजेंद्र कुलकर्णी, कृष्णा दिवटे, कैलास चौधरी, अक्षय कटियार व इतर पदाधिकारी उपस्थित होते.