अरुण विद्यामंदिर व संग्राम बालवाडी मध्ये उत्साह पूर्ण वातावरणात नवागतांचे स्वागत

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी :  आपल्या अरुण विद्यामंदिर व संग्राम बालवाडी मध्ये प्रवेशोत्सव व नवागतांचे स्वागत करण्यात आले. प्रथमतः सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन संस्थेच्या मार्गदर्शन मा. नगराध्यक्षा. सौ.अलका स्वामी यांनी केले व नवागतांच्या स्वागताला सुरुवात करण्यात आली. 

      विद्यार्थ्यांचे औक्षण करून मोफत पाठ्यपुस्तके व अशोकराव स्वामी यांच्या वाढदिवसानिमित्त जमा केलेल्या वह्या व खाऊ वाटप करून विद्यार्थ्यांना शाळेमध्ये प्रवेश दिला जात होता. तसेच विद्यार्थ्यांना आपल्या शाळेच्या पहिल्या दिवसाची आठवण राहावी म्हणून शाळेमध्ये फोटो पॉईंट व आकर्षक अशी फुग्यांची सजावट करण्यात आली होती. विद्यार्थी आनंदाने फोटो पॉईंट मधून आपल्या पहिल्या दिवसाची आठवण टिपत होते.

          यावेळी शाळेचे  मुख्याध्यापक श्री.संजय कोळी सर्व शिक्षक, विद्यार्थी  उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post