जाहीर व्याख्यान व बक्षीस समारंभाचे मंगळवारी आयोजन

प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी ता.२० लोकराजे छत्रपती शाहू महाराज यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त समाजवादी प्रबोधिनी ,प्रबोधन वाचनालय आणि वृत्तपत्र पत्रलेखक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने इतिहासाचे व्यासंगी अभ्यासक प्राचार्य डॉ.टी.एस. पाटील यांचे " आजच्या संदर्भात शाहू " या विषयावर जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. 

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रांताधिकारी मौसमी चौगुले भुषवणार आहेत. या संयोजक संस्थांच्या वतीने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ' मी मतदार : माझी जबाबदारी ' या विषयावर पत्रलेखन स्पर्धा आयोजित केली होती. त्याचा बक्षीस समारंभही यावेळी होणार आहे. व्याख्यान व बक्षीस समारंभ राजर्षी शाहू जयंतीच्या पूर्वसंध्येला मंगळवार ता. २५ जून २०२४ सायं.६ वाजता समाजवादी प्रबोधिनी , राजर्षी शाहू पुतळ्याजवळ, इचलकरंजी येथे होणार आहे. तरी या कार्यक्रमास सर्व जिज्ञासूंनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post