इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने शहरातील पुरबाधीत क्षेत्रामध्ये स्वच्छता मोहीम संपन्न



प्रेस मीडिया लाईव्ह :

  इचलकरंजी महानगरपालिका क्षेत्रातील संभाव्य पूरपरिस्थितीच्या पाश्र्वभूमीवर पुरबाधित होत असलेले वॉर्ड क्रमांक १ व २ मधील शेळके मळा, हणभर गल्ली, मरगुबाई मंदिर चौक, बागडे गल्ली, नदी नाका, मुजावर गल्ली, श्रीपाद नगर, जय भवानी परिसर, बागवान पट्टी या परिसरामध्ये आज शुक्रवार दि.७ जून रोजी आरोग्य विभागाच्या वतीने स्वच्छता मोहीम राबविणेत आलेली होती.

          आरोग्य विभागाकडील जवळपास ३०० कर्मचाऱ्यांनी आजच्या स्वच्छते मोहिमेत सहभागी होऊन या परिसरातील सर्व रस्ते, गटारी, नाले, सारण गटारी स्वच्छ केले. तसेच आदर्श कंपनी कडून १६ ट्रॅक्टर ट्रॉली,  दोन कॉम्पॅक्टर वाहनांमधून सर्व कचरा उठाव केला.

    या स्वच्छता मोहीमेत उपायुक्त सोमनाथ आढाव आणि आरोग्य अधिकारी डॉ. सुनिलदत्त संगेवार यांनी  उपस्थित राहून  कर्मचारी यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. तसेच या भागामध्ये गटारी वरील अतिक्रमण झालेचे निदर्शनास आलेने सदर सर्व अतिक्रमण काढून घेण्याच्या सूचना संबंधित नागरिकांना दिल्या. त्याचबरोबर  या भागामध्ये रस्त्याकडेला आणि गटारी मधे शेण टाकत असलेले सुद्धा निदर्शनास आलेने शेण  टाकणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करावी अशा सक्त सूचना संबंधित स्वच्छता निरीक्षक यांना दिल्या. 

           या मोहिमेत महानगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांसह, सर्व वॉर्ड इन्स्पेक्टर यांचेसह आदर्श कंपनीचे पर्यवेक्षक आणि मक्तेदारांकडील सफाई कर्मचाऱ्यांनी सुद्धा  सहभाग घेतला. 

--------------------------------------------------------------------------

बजेट सॉफ्टवेअर प्रणालीमुळे मनपा कामकाजात सुसूत्रता  आणि पारदर्शकता येणार:- आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे

    इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांचेकडून महानगरपालिका प्रशासकीय कामकाजात सुसूत्रता आणि पारदर्शकता आणण्यासाठी विविध प्रयत्न करणेत येत आहेत.

         या अनुषंगाने आयुक्त यांनी महानगरपालिकेच्या वतीने विविध विकास कामांमध्ये सुसूत्रता आणि पारदर्शकता येण्यासाठी *बजेट सॉफ्टवेअर प्रणालीचा* वापर करणे बाबतच्या सुचना दिलेल्या होत्या. या सुचनेनुसार गेले काही दिवस बजेट सॉफ्टवेअर प्रणालीचे ॲप्लिकेशन विकसित करणेचे काम सुरू होते.

     आज या  बजेट सॉफ्टवेअर प्रणालीचे तज्ञ पंकज गुप्ता यांनी प्रोजेक्टरच्या माध्यमातून  आयुक्त यांचे दालनात  आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे, उपायुक्त सोमनाथ आढाव आणि  सर्व विभाग प्रमुख यांच्या समोर सादरीकरण केले.  सादरीकरणाचे दरम्यान या ॲप्लिकेशन बाबतची सविस्तर माहिती आणि प्रशिक्षण सर्व विभाग प्रमुख यांना दिले.

    या प्रणालीमुळे आयुक्त , उपायुक्त तसेच सर्व विभाग प्रमुखांना आपल्या विभागाकडील बजेटची सविस्तर माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. तसेच महानगर पालिकेकडून होत असलेल्या विविध विकास कामांच्या निविदा प्रक्रिया राबविणे कामी सुसूत्रता आणि पारदर्शकता येणार आहे. देयक अदा करताना कामा पुर्वीचे आणि कामा नंतरचे जिओ ट्रॅकिंग फोटो अपलोड करणे आवश्यक असलेने देयक अदा करणे सुलभ होणार आहे.

    दि. १८ जून पर्यंत सर्व विभाग प्रमुखांनी आपल्या विभागाकडील चालू आर्थिक वर्षातील बजेटची आणि प्रलंबित देयकाबाबतची सविस्तर माहिती अपलोड करणेचेआदेश दिलेले आहेत. या बजेट सॉफ्टवेअर प्रणालीवर पुर्णपणे आयुक्त यांचे नियंत्रण राहणार आहे.

  याप्रसंगी सहा आयुक्त विजय राजापुरे, मुख्य वित्त व लेखा अधिकारी विकास खोळपे, मुख्य लेखा परीक्षक आरती खोत,शहर अभियंता महेंद्र क्षिरसागर, आरोग्य अधिकारी डॉ सुनिलदत्त संगेवार यांचे सह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.


      

Post a Comment

Previous Post Next Post