बस स्थानकातील काँक्रिटीकरण काम कासवाच्या गतीने ..



प्रेस मीडिया लाईव्ह

इचलकरंजी बस स्थानकात गेल्या दोन अडीच महिन्यांपासून नूतनीकरणाचे  काम  कासवाच्या गतीने चालू आहे. त्या मक्तेदारास कामास दिरंगाईने काम चालू असलेमुळे  आज इचलकरंजी भारतीय जनता पार्टी च्या पदाधिकारी  कार्यकर्त्यांनी संबंधित मक्तेदार व इंजिनिअर यांना चांगलेच धारेवर धरले.


इचलकरंजी स्थानकातील काँक्रिटीकरण गेले आठवडाभर ठप्प होते वेळोवेळी भाजपा पदाधिकारी यांनी संबंधितांना कामाबाबत सुचना केली होती. पावसाळ्यापूर्वी पहिल्या टप्प्यातील काँक्रिटीकरण पूर्ण करून फलटावर बस लागेल अशी व्यवस्था करावी परंतु संबंधित  मक्तेदाराकडून आश्वासना शिवाय काहीही उत्तर मिळत नव्हते म्हणून आज प्रत्यक्ष कामाची पाहणी करून पावसाळापूर्वी पहिल्या टप्प्यातील काँक्रिटीकरण पूर्ण करून घेण्यासाठी व नुतनीकरण कामाचा बोर्ड का लावला गेला नाही म्हणून धरले धारेवर 

यावेळी संबंधितां मक्तेदार प्रतिनिधी कडून काही शहरातील राजकीय युवा नेते मंडळी कडून कामाबाबत अडचणी निर्माण करण्यात येत आहेत असे चर्चवेळी बोलताना सांगितले. असे जर पुन्हा आपणास कामाबाबत कोणी अडचणी करत असेल तर आम्ही त्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील आहोत. व त्या नेत्याच्या विरोधात आंदोलन सुरू केले जाईल तरी आपण काम लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावे अन्यथा मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू केले जाईल असे शहराध्यक्ष पै.अमृतमामा भोसले यांनी सांगितले.

यावेळी युवा मोर्चा अध्यक्ष जयेश बुगड, सरचिटणीस राजेश रजपुते, उत्तम चव्हाण, उपाध्यक्ष उमाकांत दाभोळे, दिपक पाटील,  प्रदिप मळगे, अनिस म्हालदार, मारुती पाथरवड, सचिन माळी, म्हाळसाकांत कवडे, दिपक कडोलकर, अशोक राजपुरोहित, नामदेव सातपुते, नितीन पडियार, कृष्णात सातपुते, अर्जुन सुतार, जयवंत पाटील, जिलाणी टाकवडे शंकर झित्रे, हर्षवर्धन गोरे आदि पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post