एकाच वेळी 18 ज्येष्ठांचा वाढदिवस साजरा

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

 हेरले प्रतिनिधी  / संदीप कोले 

 हातकणंगले तालुक्यातील हेरले येथील गौतम ज्येष्ठ नागरिक सेवा संघाच्या वतीने 18 ज्येष्ठांचा सामुदायिक केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण केले. त्यावेळी अशोक कदम, रमेश भाटे, रमेश कटकोळे, तातोबा चौगुले, अशोक खाबडे, आदिनाथ उलसार, गोपाल खाबडे,अशोक चौगुले, श्रीधर कटकोळे, सुदाम कुरणे, रमेश कदम, पद्माकर कुरणे, संजय खाबडे, दिलीप कुरणे, श्रीकांत कुरणे,  सोलोमन चौगुले,  निशिकांत खाबडे, भीमराव उलसार अशा ज्येष्ठांचा मोठ्या उत्साहाने पुष्पगुच्छ व शुभेच्छा देऊन वाढदिवस साजरा करण्यात आला. 

या वाढदिवसा दिवशी काही ज्येष्ठांच्या वतीने वृक्षारोपण केले. त्यावेळी या वाढदिवसानिमित्त ज्येष्ठांच्या वतीने केळी व बिस्किट पुडा देण्यात आला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी मुख्याध्यापक विश्वास भाटे यांनी केले. व स्वागत व आभार ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष अशोक कदम यांनी मांडले. त्यावेळी इतर ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होता.


 

Post a Comment

Previous Post Next Post