150 वी छत्रपती शाहू महाराज जयंती हेरले बौद्ध समाजाच्या वतीने मोठ्या जल्लोषात साजरी


प्रेस मीडिया लाईव्ह :

हेरले  / प्रतिनिधी 

 आरक्षणाचे जनक व आपल्या कृतीतून सामाजिक संस्थेचा संदेश देणारे राजे छत्रपती  शाहू महाराज यांची 150 वी जयंती संयुक्त बौद्ध  समाजाच्या वतीने मोठ्या उत्साहाने व जल्लोषात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन  छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले छत्रपती  शाहू महाराज, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस  समाजातील ज्येष्ठ नागरिक,सामाजिक कार्यकर्त्या वतीने हार अर्पण  करण्यात आला व सायंकाळी पाच वाजता छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन राजेश पाटील, आदगोंडा पाटील व इतर मान्यवरांच्या हस्ते करून भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली त्यावेळी गावातील व समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

-----------------------------------------------------------------------

स्वराज्य तालीम मंडळ संयुक्त राजेंद्र नगर यांच्यावतीने लोकराजा राजश्री शाहूजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आठ CCTV कॅमेऱ्याचं लोकार्पण संपन्न

हेरले /प्रतिनिधी  

सालाबाद प्रमाणे स्वराज्य तालीम मंडळाच्या आज दिनांक 26 नोव्हेंबर 2024 रोजी लोक राजा राजश्री शाहू महाराजांच्या जयंती निमित्त प्रतिमा पूजन राजारामपुरी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक मा सचिन चंदन साहेब यांच्या हस्ते करून अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला तसेच राजेंद्र नगर परिसरामध्ये युवा पिढीमध्ये वाढती गुन्हेगारी, वाढती व्यसनाधीनता, वाढते चोरीचे प्रकार या गोष्टीचा समाजावर होणारे दुष्परिणाम लक्षात घेऊन स्वराज्य तालीम मंडळ परिसरामध्ये मंडळाच्या स्वखर्चाने आठ CCTV कॅमेरे बसवून त्याचे उद्घाटन नगरसेवक प्रा जयंत पाटील सर यांच्या हस्ते करण्यात आले . 

कार्यक्रमाप्रसंगी मंडळाचे आधारस्तंभ सुखदेव दादा बुध्याळकर, KMC आरोग्य वार्ड इन्स्पेक्टर सुशांत कवडे साहेब, माजी नगरसेवक लाला भोसले, नामदेव नागटिळे, सोमनाथ घोडेराव, आजम शेख, उदय कांबळे, मुकादम अमोल भोसले, नागेश शिंदे, भारत कोकाटे, समाधान बनसोडे,अक्षय रजपूत, सुरेश नागटोळे, दयानंद गालफाडे, मारुती काळे संतोष हिरवे तसेच मंडळाचे पदाधिकारी अध्यक्ष प्रवीण बनसोडे, खजानिस सुरेश आठवले, साजन शिंदे, तानाजी मिसाळ, शिवराम बुधाळकर, उमेश भोसले, सौरभ बुध्याळकर तसेच भागातील कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.*

Post a Comment

Previous Post Next Post