अतिग्रे येथील विद्यामंदिर जिल्हा परिषद शाळेमध्ये मुलांचे मोठ्या उत्साहात स्वागत

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

पश्चिम महाराष्ट्र प्रतिनिधी :  भरत शिंदे

हातकणंगले तालुक्यातील अतिग्रे येथील विद्यामंदिर अतिग्रे या शाळेमध्ये आज 15 जून रोजी शाळेच्या पहिल्या दिवशी सर्व मुलांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले यावेळी इयत्ता पहिलीच्या वर्गातील पहिला प्रवेश त्या मुलांच्या डोक्यावरती टोपी, हातामध्ये फुगे ,व हातामध्ये माझ्या शाळेतील पहिले पाऊल आनंदी शिक्षणाची चाहूल असे फलक होते


 त्यानंतर शाळेतील पटांगणावरती आलेल्या पाहुण्यांचे स्वागत मुलांनी केले अतिग्रे गावचे लोकनियुक्त सरपंच माननीय श्री सुशांत वड्ड, उपसरपंच श्री बाबासो पाटील ,सदस्य भगवान पाटील, राजेंद्र कांबळे ,अनिरुद्ध कांबळे ,सदस्या सौ कलावती गुरव ,श्रीमती अक्का ताई शिंदे, सौ कल्पना पाटील ,छाया पाटील, दिपाली पाटील ,वर्षा बिडकर ,शालेय व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष सदस्य तसेच सामाजिक कार्यकर्ते विश्वास पाटील, सुजित पाटील ,पत्रकार भरत शिंदे पालक वर्ग यांचे स्वागत गुलाब पुष्प देऊन विद्यामंदिर अतिग्रे चे मुख्याध्यापक श्री राजकुमार भोसले व सर्व शिक्षक स्टाफ यांनी केले तसेच विद्यामंदिर अतिग्रे या शाळेमध्ये नव्याने रुजू झालेले मुख्याध्यापक श्री राजकुमार भोसले यांचे शाल श्रीफळ देऊन स्वागत सरपंच ,उपसरपंच व सर्व सदस्यांनी केले तसेच मुलांना पाठ्यपुस्तके व गणवेश वाटप करण्यात आले व मुलांना गोड धोड असे खाऊ वाटप करण्यात आले 

यावेळी सरपंच श्री सुशांत वड्ड म्हणाले की आम्ही याच विद्यामंदिर अतिग्रे जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षण घेतले तुम्ही पण या जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षण घ्यावे मुलांना चांगल्या प्रकारचे ज्ञान व विचार प्रकट केले जाते तसेच विद्यामंदिर या जिल्हा परिषद शाळेमध्ये डिजिटल शाळा, रंग-रंगोटी ,संगणक अशा भौतिक सुविधा पुरविल्या जातील असे सांगितले यावेळी विद्या मंदिर शाळेचे शिक्षक राजाराम कोठावळे, तुकाराम माने, शिक्षिका रोहिणी बडे, सरिता रानगे, पुनम परीट, वंदना पाटील हे उपस्थित होते



Post a Comment

Previous Post Next Post