आपले ठेवावे झाकून दुसऱ्याच बघावे वाकून...

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

सध्याचे राजकारण हे अतिशय गढ़ळ  आणि कालच्या थराला गेले आहे. जिकडे तिकडे जात,पात, पंथ, धर्म हेच मुद्दे कळीचे राहिले आहेत. जाती पातीच्या पलीकडे आपण कधी जाणार हेच कळेनासे झाले आहे. लोकसभेच्या निवडणुकीसाठी सारा देश उत्सुक असताना सर्वसामान्य जनतेचे प्रश्न अधांतरीतच राहिले आहेत.महागाई, बेरोजगारी, विकासात्मक कामे गरीबा पर्यंत कुठपर्यत पोहोचले आहे, हे खरेच पाहण्याचे काम आहे. निष्कळ बड़बड आणि आपणच कसे बरोबर आणि आपणच आत्ता विकासाचे पाढे वाचले आहेत, अशा ऐटीतच सर्व राजकारणी मंडळी वावरताना दिसत आहेत. गृहिणींच्या जिव्हाळ्याचा महागाईचा प्रश्न हा ऐरणीवर असतानाच बेरोजगारीचा प्रश्न निर्माण झालेला असताना या सर्व बाबंकडे ढुंकूनही न पाहता फक्त जातीपातीचे राजकारण करुन उदोउदोचे राजकारण करत सर्वसामान्यांना पायदळी तुडवले जात आहे. आपल्याला आपले कर्मच घडवत असते. परंतु लोकशाही मध्ये सत्ताधान्यांनाही तितकेच महत्व असते. त्यांच्याच कार्यातून विकासाचा रथ पुढ़े न्यायला लागतो. आत्तापर्यत भारताने विकसनशिल देशाचे रुपडे जपले आहे. परंतु सर्वसामान्यांचे प्रश्नाचे नेहमी वावडे असल्याचेच सर्व राजकारणी मंडळीं कडून दिसून येत आहे. गरीबी हटलीच नाही परंतु सगळीकडे आपलेच गुणगाण गात अशातऱ्हेने हुंकमी राजवट आणली जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. पेट्रोल-डिझेलचे वाढते भाव आणि त्या मध्ये चैनीच्या वस्तूंचा भरमसाठ फायदा करण्यासाठी त्यामध्ये मात्र, भरपूर सवलती हा द्टप्पीपणा सर्वसामान्य जनतेला रुचणारा नाही. गांधीजींनी राजकारणात अंहिसेचे तत्व रुजवले. पण, आत्ताच्या सर्व राजकीय पक्षातील राजकारण द्रेषाने भरलेले आहे. विकासकार्य करताना कल्याणकारी योजनांवर भर असायला हवा.यावेळी लोक धर्म, जात, पंथ, श्रद्धा, लैगिक भाष्य यामधील भेदभाव बाजूला सारून्र संविधानाच्या रक्षणासाठी एकत्र आलेले आहेत, त्यामुळे ही निवडणूक कायम स्मरणात राहिल. जनतेच्या मुद्यांवरच खरेतर ही निवडणूक कायम स्मरणात राहणारी असेल. आत्ताच्या एकूणच प्रचारा मध्ये नको ते नाहक प्रश्न उपस्थित केले गेले आणि विनाकारण द्वेषाचे राजकारण पुढ़े आणले जात आहे. एकूणच पक्षांतील भांडणांचे स्वरुपआणि पळवापळवीचा प्रकार पाहता महागाई, बेरोजगारीच प्रश्न शुन्यच राहिलेला दिसला आणि नको तो वाद पुन्हा उकरून काढला जात आहे.

आरक्षण, जातीयवाद पेरला जात आहे.त्यामुळेच एकूणच हा परिणाम येत्या निकालावर दिसून आल्यास नवल वाटायला नको. राजकारणात कोणीही धुतल्या तांदळासारखे स्वच्छ नाहीत प्रत्येकाच्या दिव्याखाली अंधार आहेच तो त्यांना दिसत नाही ,आज प्रत्येक राजकारणी  दुसऱ्याने केलेला भ्रष्टाचार बाहेर कसा काढता येईल याच्याच विचारत असतात जनतेच्या प्रश्नाबाबत त्यांना त्याचे काही देणे घेणे नसते. फक्त आपले ठेवावे झाकून दुसऱ्याच बघा वाकून एवढेच काम  सुरू आहे

Post a Comment

Previous Post Next Post