सुतावरुन स्वर्ग गाठता येतो.अशी स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाची कारवाई.
प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर /जयसिंगपूर - पैशाच्या हव्यासा पोटी जरीनाबेगम मोहम्मद युसूफ खान (वय .64.रा.नागपाडा ,मुंबई मुळगाव बागलकोट) याचा खून केल्या प्रकरणी प्रकाश सोमय्या चव्हाण (वय 37.रा चंदूर ता.हातकणंगले) आणि त्याचा साथीदार राजू वालाप्पा नायक (वय 36.रा .डीकेटी कॉलेज आसरानगर ,इंचलकरंजी) यांना स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अ टक करून त्यांच्या कडील रोख रक्कमसह 15 लाख 40 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की,जयसिंगपूर पोलिसांना शुक्रवार दि.21 जून रोजी कवठेसार येथे असलेल्या वारणा नदीच्या पात्रात कुजलेल्या अवस्थेत वयस्कर स्त्रीचे प्रेत सापडले होते.या घटनेची नोंद जयसिंगपूर पोलिसांत झाली होती.वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी घटना स्थळी भेट देऊन स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकासह जयसिंगपूर पोलिसांना तपासाच्या सूचना दिल्या होत्या.
स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकानी आसपासच्या गावात बेपत्ता झालेल्या व्यक्तीचा शोध घेत असताना या पथकास एक वर्षापूर्वी मुंबईहून चंदुर येथे नातेवाईकांच्याकडे रहाण्यास आली असून गेल्या दहा बारा दिवसापासून गायब झाल्याची माहिती मिळाली असता या माहितीच्या आधारे मयत बहिणीचा मुलगा प्रकाश चव्हाण याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने माहिती दिली की ,मयत जरीनाबेगम या वडिलासह लहानपणापासून चंदूर येथे रहात होत्या वीस वर्षांपूर्वी त्यांचा प्रेमविवाह झालेला होता.त्या पती समवेत नागपाडा ,मुंबई येथे रहाण्यास होत्या.लग्नानंतर अडीच वर्षापूर्वी त्यांच्या पतीचा मृत्यु झाला.त्यानंतर सासरच्या मंडळी त्रास देत असल्याचे बहिणीचा मुलगा प्रकाश चव्हाण याला माहिती दिली प्रकाश याने मुंबईतील घर विकून चंदूर येथे येण्यास सांगितले असता त्याच्या सांगण्याप्रमाणे जरीना बेगम यांनी 28 लाखांला घर विकून चंदूर येथे रहाण्यास आल्या .एक वर्षापूर्वी त्यांना त्वचा रोग झाल्याने घरात कोठेही संडास करून घाण करू लागल्या .तिच्या कडे मोठी रक्कम असल्याने तिला ठार मारले तर ती रक्कम आपल्यास मिळेल या हेतुने प्रकाश चव्हाण यांनी दि.11 जून रोजी रात्रीच्या वेळेस झोपेच्या गोळ्या देऊन तिचा गळा दाबून ठार मारले.त्या नंतर पुरावा नष्ट करण्यासाठी त्याने आपला साथीदार राजू नायक याच्या मदतीने बारदानच्या पोत्यात प्रेत घालून पल्सर मोटारसायकल वरुन कुंभोज ते दुधगाव हद्दीत असलेल्या वारणा नदीच्या पात्रात पुलावरुन फेकल्याची माहिती दिली असता त्याला आणि त्याच्या साथीदारांस स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अ टक करून त्यांच्या कडील रोख रक्कम आणि इतर असा 15 लाख 40 हजारांचा मुद्देमाल जप्त करून या दोघांना पुढ़ील तपासासाठी जयसिंगपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
हा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने कोणताही पुरावा नसताना आणि किचकट असा गुन्हा असलेला आपल्या कौशल्याने केला आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक महेंद्र पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमळकर ,पोलिस उपनिरीक्षक शेष मोरे,जयसिंगपूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सत्यवान हाके ,पोलिस उपनिरीक्षक अतिश म्हेत्रे यांच्यासह त्यांच्या पथकाने केली.