क्राईम न्यूज : मुलीच्या बापाने केला मुलीच्या प्रेमवीराचा खून.

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर - आपल्या मुलीचा नाद सोड म्हणुन वारंवार सांगून ही ऐकण्याच्या स्थितीत नसलेला संकेत संदिप खामकर (वय 21.रा.पाडळी,ता.हातकंणगले ) याचा शुक्रवार दि.14/06/2024  रोजी रात्री सव्वा दहाच्या सुमारास  बुधले मंगल कार्यालय येथील हॉटेल सह्याद्री जवळ  धारदार शस्त्राने संकेतच्या छातीवर वार करून खून केला.या प्रकरणी मुलीचे वडील योगेश सुर्यवंशी याला पोलिसांनी अटक केली आहे.

अधिक माहिती अशी की , संकेच्या चुलत्याचे पेठवडगाव येथे झेरॉक्स मशीन आणि इतर साहित्याचे दुकान आहे तर मुलीच्या वडिलांचे त्यांच्या शेजारीच मोटारसायकल गाड्याचे पंक्चरचे दुकान आहे.शेजारी शेजारी दुकाने असल्याने संकेतचे व मुलीचे ओळख होऊन एकमेकावर प्रेम करु लागले ही माहिती मुलीच्या वडिलांना समजताच त्यानी संकेतला आपल्या मुलीचा नाद सोड म्हणुन अनेक वेळा प्रयत्न केला पण संकेतच्यात फरक पडला नाही.शुक्रवारी रात्री पु.शिरोली येथे मंगल कार्यालयात योगेश यांच्या पाहुण्यांचा कार्यक्रम होता.त्या वेळी संकेत मित्राबरोबर मुलीस भेटण्यास आला असता संकेत आणि मुलीच्या वडिलांत वाड़ झाल्याने संकेत बाहेर घेऊन त्याच्यावर धारदार शस्त्रांने छातीवर करून त्याला ठार मारुन पळून गेला.या वेळी रक्ताताच्या थारोळ्यात पडलेल्या संकेतला उपचारासाठी त्याच्या नातेवाईकांनी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्याचा उपचारापूर्वी मृत्यु झाला.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.दरम्यान खून करून पळुन गेलेला योगेश याला कर्नाटकातुन पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली.याचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक पंकज गिरी ,पोलिस समीर मुल्ला निलेश कांबळे यांनी केला.

Post a Comment

Previous Post Next Post