प्रेस मीडिया लाईव्ह :
विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील
देवीचा पाडा येथे राहणारा समीर हा रविवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास त्याची मैत्रीण आलिया शेख हीला भेटण्यासाठी तीच्या घरी गेला होता बहिणीसोबत एकटा घरात दिसल्याने त्याला ठार केले, तळोजातील घटना
तळोजा गावामध्ये पाटीलवाडी येथील मारवाडी इमारतीमध्ये घरात बहिणीसोबत बंद घरात एक तरुण आढळल्याने त्याला कोंडून भाऊ आणि त्याच्या वडीलाने बेदम मारहाण केली. या मारहाणीत १८ वर्षाचा तरुण ठार झाला. मृत तरुणाचे नाव समीर अब्दुल शेख असे आहे. देवीचा पाडा येथे राहणारा समीर हा रविवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सूमारास त्याची मैत्रीण आलिया शेख हीला भेटण्यासाठी तीच्या घरी गेला होता. आलियाने स्वता समीरला भेटण्यासाठी घरी बोलावले होते.
या दरम्यान आलियाचा भाऊ ताहीर कामावरुन घरी परत आला. परंतू आलियाने दरवाजा न उघडल्याने त्याला संशय आला. काही मिनिटे दरवाजा ठोठावल्यानंतर त्याने दरवाज्यावर लाथा मारून दरवाजा उघडला.घरात प्रवेश केल्यावर ताहीरला आलिया व समीर एकत्र दिसल्याने त्याने वडील युसूफ यांना घरी बोलावून घेतले. युसूफ घरी आल्यावर समीरला घरातील लोखंडी फावड्याने बापलेकांनी जबर मारहाण केली. युसूफने लोखंडी कोयत्याने समीरच्या डोक्यात प्रहार केला. या मारहाणीत समीरचा मृत्यू झाला. यादरम्यान समीरला रक्ताच्या थारोळ्यात पाहील्यावर आलियाच्या घराशेजारी राहणा-या समीरच्या काकी मैनाखातुन अली शेख यांनी युसूफ व ताहीरला रोखण्याचा प्रयत्न केला त्यांच्याही पोटात लाथ मारुन त्यांना खाली पाडण्यात आले.
या प्रकरणानंतर तळोजा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक अविनाथ काळदाते यांनी घटनास्थळी भेट देऊन हत्येचा गुन्हा युसूफ व ताहीर यांच्यावर नोंदविला आहे. पोलीस निरिक्षक रमेश जाधव, सहाय्यक पोलीस निरिक्षक बाबु खाटपे, सतीश गोरे, पोलीस उपनिरिक्षक सूरेश कु-हाडे यांनी ४५ वर्षीय युसूफ व २४ वर्षीय ताहीरला अटक केली.