राजर्षी शाहू महाराज यांच्या शतकोत्तर जयंती निमित्य अतिग्रे येथे वृक्षारोपण संपन्न

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

पश्चिम महाराष्ट्र प्रतिनिधी : भरत शिंदे

 हातकणंगले तालुक्यातील अतिग्रे येथे सुवर्ण महोत्सवी राजर्षी शाहू महाराज जयंती उत्सवानिमित्त जिल्हापरिषद कोल्हापूर च्या वतिने दि. २१ जुन ते ३० जुन पर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते सदरचा कार्यक्रम दहा दिवस दहा ठिकाणी होता त्यापैकी शेवटचा दिवस म्हणजे रविवार दिनांक 30 जून रोजी या समारोपाच्या कार्यक्रमात राजर्षी शाहू महाराजांच्या पदस्पर्शाने पूणीत झालेल्या ऐतिहासिक शाहू तलावाच्या परिसरामध्ये वृक्षारोपण,स्वच्छता व परिसराचे सुशोभीकरण असा कार्यक्रम नियोजित होता . 

 या कार्यक्रमाचे आयोजक माननीय लोकनियुक्त सरपंच सुशांत वड्ड ग्रामपंचायत अतिग्रे, च्या वतिने करण्यात आले त्यामध्ये सहभाग आधार फाउंडेशन रूकडी, शाहू फाउंडेशन अतिग्रे,संजय घोडावत विद्यापीठ,विद्या मंदिर अतिग्रे यांच्या सहकार्याने   व हातकणंगले च्या गटविकास अधिकारी शबाना मोकाशी , उपस्थित ५०० देशी वृक्षांचे वृक्षारोपण उत्साहात संपन्न झाले  यावेळी बोलताना गटविकास अधिकारी म्हणाल्या की प्रत्येक वर्षी पावसाळा चालू झाला की पंचायत समितीच्या वतिने वृक्षारोपण ची मोहिम हाती घेतली जाते पण त्यातील थोडेच वृक्ष जिवंत राहतात यासाठी केवळ वृक्षारोपण करून आपली जबाबदारी संपत नाही तर लावलेली झाडे जगवण्यासाठी प्रत्येक गावातील तरुणांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले, 

यावेळी त्यांनी आधार फाउंडेशन वृक्षारोपण व वृक्ष संवर्धनासाठी  करीत असलेल्या कार्याचे कौतुक केले या कार्यक्रमास मंडल अधिकारी  नवेली बेळणेकर,कृषी अधिकारी सतीश देशमुख, ग्रामसेवक बाबासाहेब कापसे,तलाठी नितीन जाधव, केंद्र प्रमुख शशिकांत पाटील, आरोग्य अधिकारी डॉक्टर उषा राणी खोत, आरोग्य सेवक महेश वडर, मुख्याध्यापक राजकुमार भोसले, सरपंच सुशांत वड्ड,उपसरपंच बाबासाहेब पाटील , सदस्य, भगवान पाटील, नितीन पाटील, राजेंद्र कांबळे, अनिरुद्ध कांबळे, सदस्या अक्काताई शिंदे, दिपाली पाटील,कलावती गुरव, छाया पाटील, कल्पना पाटील, वर्षा बिडकर,माझी लोकनियुक्त सरपंच सागर पाटील, पांडुरंग पाटील विद्या मंदिर शाळेतील सर्व शिक्षक विद्यार्थी, आधार फाउंडेशन सर्व टीम, शाहू फाउंडेशन अतिग्रे सर्व टीम , अंगणवाडी सेविका, मदतनीस , आरोग्य विभाग अशा सेविका,संजय घोडावत युनिव्हर्सिटी शिक्षक व विद्यार्थी, पंचक्रोशीतील पत्रकार बंधू, व नागरिक मोठया संख्यने उपस्थित होते. शेवटी सर्वांना ग्रामपंचायत मार्फत चहा नाश्ता देऊन या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली

Post a Comment

Previous Post Next Post