प्रेस मीडिया लाईव्ह :
पश्चिम महाराष्ट्र प्रतिनिधी : भरत शिंदे
अतिग्रे तालुका हातकणंगले येथील लोकनियुक्त सरपंच माननीय श्री सुशांत वड्ड , उपसरपंच, सर्व सदस्य व ग्रामविकास अधिकारी यांच्या प्रयत्नाने गेली बारा ते तेरा वर्षे बंद असणारी जलस्वराज्य पाणीपुरवठा पाईपलाईन तब्बल दोन ते तीन महिन्यानंतर जवळपास 40 ते 50 लिकेजेस , जवळपास दोन ते अडीच हजार स्क्वेअर फुट नवीन पाईप लाईन शेतकऱ्यांनी खनि काढणे, शेताची डेव्हलपमेंट करणे यासाठी उकरली होती ती नवीन पाईप टाकून पूर्ण करून अतिग्रे येथे असणारे ग्रामदैवत मारुतीरायाच्या कृपेने शनिवारी सायंकाळी ठीक सात वाजता गावामध्ये पाणी पाडण्यात यश आले
यामध्ये सरपंच माननीय श्री सुशांत वड्ड, उपसरपंच श्री बाबासो पाटील, सर्व सदस्य, ग्रामविकास अधिकारी बाबासाहेब कापसे ,ग्रामपंचायत कर्मचारी, माजी सरपंच प्रशांत गुरव, उत्तम पाटील, अमर पाटील ,धनाजी पाटील, पत्रकार भरत शिंदे, विद्यमान सदस्य अनिरुद्ध कांबळे, राजेंद्र कांबळे, नितीन पाटील, माझी लोकनियुक्त सरपंच सागर पाटील, माजी सरपंच पांडुरंग पाटील ,माजी सरपंच दत्तात्रय बिडकर, तंटामुक्त अध्यक्ष दीपक पाटील तसेच गावातील सामाजिक कार्यकर्ते यांनी अहोरात्र कष्ट करून परिश्रम घेतले यामध्ये खास करून विद्यमान ग्रामपंचायत सदस्य श्री भगवान पाटील यांना त्या पाईप लाईनची संपूर्ण माहिती असल्याने त्यांचे त्यामध्ये मोठे योगदान लाभले तसेच अतिग्रे गावचे उद्योजक संजय चौगुले व रूकडी गावचे महावीर भोकरे यांचे फार मोठे श्रम लाभले
यावेळी उपस्थित सामाजिक कार्यकर्ते धुळोबा पाटील, अशोक मुसळे, सचिन पाटील, प्रदीप पाटील ,राजवर्धन पाटील, सुजित पाटील ,राम पाटील ,लखन पाटील ,विश्वास पाटील, सौरभ फडतारे, अजित पाटील आदी ग्रामस्थ उपस्थित होते