प्रेस मीडिया लाईव्ह :
पश्चिम महाराष्ट्र प्रतिनिधी : भरत शिंदे
रत्नागिरी नागपूर महामार्ग क्र १६६ साठी अतिग्रे येथे मोजणीसाठी आलेल्या प्राधिकरण अधिकारी व भूमि अभिलेख विभागाच्या अधिकाऱ्यावर शेतकऱ्यांनी व मिळकत धारकांनी विविध प्रश्नांचा भडिमार केला.
भूमि अभिलेख विभागाने ग्रामपंचायत मिळकत नोंदी प्रमाणे मोजणीच्या नोटिसा काढणे अपेक्षित असताना त्यांनी त्यांच्या कडे असलेल्या १९६७ च्या नोंदी प्रमाणे नोटिसा काढल्या आहेत यातील बरेच मिळकत धारक मयत झाले आहेत तर काही मिळकत धारकांना व शेतकऱ्यांना मोजणीच्या दिवसा पर्यन्त नोटिसा मिळाल्या नाहीत तर काही शेतकऱ्यांना मोजणी दिवशी नोटिसा लागू केल्या आहेत या भूमि अभिलेख च्या भोंगळ कारभाराचा शेतकरी व मिळकत धारकांनी निषेध केला.
या महामार्गासाठी रत्नागिरी ते चोकाक पर्यंतचे भूसंपादन करीत असताना नापीक जमिनीसह सरसकट चौपट दर नुकसानरपाई दिली आहे तर चोकाक ते उदगाव पर्यंत च्या बागायत जमिनिला दोन पट नुकसान भरपाई मिळणार असल्याने शेतकऱ्या मध्ये असंतोष आहे त्या मुळे या बाबतचा चौपट नुकसाभरपाई मिळणार नसेल तर महामार्गाचे काम बंद पाडले जाईल असा इशारा या वेळी शेतकऱ्यांनी दिला या वेळी प्राधिकरणाचे अधिकारी अजय महात्मे,महेश पाटोळे यांनी जिल्हा भूसंपादन अधिकारी विवेक काळे यांच्या बरोबर शेतकरी व मिळकत धारकांची बैठक घेवून मोजणी तील त्रुटी दूर केल्या जातील असे सांगण्यात आले या वेळी महामार्ग अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष विक्रम पाटील,राजू कांबळे,संजय सुर्यवशी, आनंदा पाटील, अनिरुद्ध कांबळे ,जयसिंग मुसळे,बाजीराव लोहार,आत्माराम बिडकर तसेच महिलावर्ग आदी उपस्थित होते.
तसेच अतिग्रे गावातील लोकनियुक्त सरपंच माननीय श्री सुशांत वड्ड यांनी सर्व मिळकत धारकांनी मागणी केल्या प्रमाणे असेसमेंट व प्रॉपर्टी कार्ड मध्ये असणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर केल्या जातील व अतिग्रे ग्रामपंचायत सर्व मिळकत धारक व शेतकऱ्यांच्या मागे असेल