प्रेस मीडिया लाईव्ह
विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील
खालापूर तालुक्यातील धावडी नदीच्या बंधाऱ्यावरिल सांडव्यात डुंबण्याचा आनंद घेत असताना एकूण चार युवकांचा दुर्दैवी मृत्यू झाला .सर्व युवक आणि युवती या रिजवी कॉलेज बांद्रा येथील आहेत.एकलव्य सिंग ईशांत यादव आकाश माने रणत बंडा अशी मृत युवकांची नावे आहेत.
सर्वांचे शव चौक प्राथमिक आरोग्य केंद्रात आणली आहेत.या ग्रूपमध्ये एकूण 37 जण होते . त्यापैकी 17 मुली होत्या.
सोंडाई किल्ल्यावर हे सर्वजण ट्रेकिंगसाठी आले होते. तेथून धावडी नदीच्या बंधाऱ्यावरिल सांडव्यात डुंबण्याचा आनंद घेत असताना ही दुर्दैवी घटना घडली. खालापूर तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे आणि कर्मचारी यांचे मार्गदर्शनाखाली अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे सदस्य श्री गुरुनाथ साटेलकर यांच्या अपघात ग्रस्त मदत टीम यांनी स्थानिक लोकांच्या मदतीने चारही लोकांचे मृतदेह बाहेर काढले पोखरवाडीतील स्थानिक युवकांनी या ऑपरेशन मध्ये सहभाग घेतला.
खालापूर तालुक्याचे उप विभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम साहेब हे स्वतः घटनास्थळी दाखल झाले होते.