प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : शिवानी अग्रवाल बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. ड्रायव्हरला धमकूल्या प्रकरणी क्राइम ब्रांच टीमकडून शिवानी अग्रवाल यांचा देखील तपास करायचा आहे. त्यामुळे, पोलिसांचे पथक त्यांना ताब्यात घेईल, या भीतीने त्या सध्या बेपत्ता आहेत. तर, शिवानी अग्रवाल यांचा फोन देखील बंद आहे. त्यामुळे, मुलाची आई व विशाल अग्रवाल यांच्या पत्नी नेमकं कुठं गायब झाल्या , असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.
पोर्शे कार अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलाच्या आईने त्यांचा ड्रायव्हर गंगाराम यास धमकवलं होतं का, याचा तपास पोलिसांकडून सध्या सुरू आहे. त्याच अनुषंगाने पोलिसांकडून त्यांच्या नातेवाईकांना आणि भावांना निरोप देण्यात आला आहे. शिवानी अग्रवाल जिथे कुठे असतील त्यांना पोलिसांशी संपर्क साधायला सांगा, असे पोलिसांनी म्हटले आहे.
पुणे पोलिसांनी आता अग्रवाल कुटुंबियांचे पासपोर्ट जप्त केले आहे. विशाल अग्रवाल, शिवानी अग्रवाल आणि त्यांचा मोठा मुलगा आणि अल्पवयीन आरोपीचा पासपोर्ट ही जप्त केला आहे. अपघात घडला तेव्हा शिवानी अग्रवाल या ससून हॉस्पिटलमध्ये हजर होत्या, अशी माहिती समोर आली आहे. तसंच त्यांनी डॉक्टरांवर दबाव टाकल्याचाही आरोप आहे.