पिंपरी चिंचवड शहरातील सर्व अनधिकृत पब हटवण्याची आयुक्तांकडे आपच्या रविराज काळे यांची मागणी

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

   पुणे शहरात कल्याणी नगर येथिल हिट अँड रन प्रकरणात दोन IT अभियंत्यांना आपला जीव गमवावा लागला .यास कारण असलेला वेदांत अगरवाल हा मद्यपान करून बेदरकार पणे वाहन चालवून त्याने अपघात केला.तो अल्पवयीन असताना सुद्धा दोन पबमध्ये त्यास मद्यपान करून दिले.हे प्रकरण जसे वाढत गेले तेव्हा पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने देखिल शहरातील सर्व अनधिकृत पबवर कारवाई करण्याचा सपाटा लावुन सर्व अनधिकृत पब्सचा सुपडा साफ केला . 


त्याच प्रमाणे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने वेळीच जागे होऊन पिंपरी चिंचवड शहरात असणारे अनधिकृत पब आणि रुफटाॅफ हाॅटेलवर त्वरीत कारवाई करण्यात यावी.आणि पिंपरी चिंचवड शहरातील सर्व पब्स चे सर्वेक्षण देखिल करण्यात यावे अशी आमची मागणी आहे.जेणे करून पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना अपघातास सामोरे जावे लागणार नाही.आपण त्वरीत कारवाई हाती घ्याल अशी आशा बाळगतो.आपण केलेल्या कारवाई संदर्भात लेखी उत्तराद्वारे कळवावे.अशी मागणी आम आदमी पार्टीचे युवक शहराध्यक्ष रविराज काळे यांनी ईमेलद्वारे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.


 रविराज बबन काळे युवक  शहराध्यक्ष आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवड 

9673268485

Post a Comment

Previous Post Next Post