ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ.राजेश नाईक यांची मागणी.
प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
यवतमाळ- यवतमाळ येथे बालाजी दाते कला आणि वाणीज्य महाविद्यालय असून या संस्थेत कु.वर्षा मनोहर कवीश्वर आणि डॉ.सौ.वर्षा धनंजय कुलकर्णी या संगीत शिक्षीका म्हणून काम करीत आहोत.त्यांनी संस्थेकडे जात व वैधता प्रमाण सादर न केल्याने आणि त्यांची शेक्षणीक पात्रता नसल्याने त्यांची चौकशी करून आणि त्यांना पाठिशी घालणारयां संस्था चालकांची चौकशी करावी.अशी मागणी तेथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ.राजेश नाईक यांनी केली आहे.
सदर कु.वर्षा कवीश्वर आणि डॉ.सौ.वर्षा कुलकर्णी या दोघी दि.01/08/1988 रोजी संगीत विषयाच्या अधिव्याख्याता पदावर रुजू झाल्या.त्यांना महाविद्यालयाच्या नियमाप्रमाणे आणि विद्यापिठाच्या अटी नुसार नियुक्ती तारखे पासून सहा महिन्यांच्या आत "जात वैधता प्रमाणपत्र "कायद्याने बंधनकारक सादर करणे आवश्यक असताना त्याच प्रमाणे आठ वर्षाच्या कालावधीत M.Phil / Ph.D पदवी पुर्ण करणे असताना त्यांनी महाविद्यालयाच्या स्थानिक व्यवस्थापन आणि संस्थेशी संगनमत करुन कायदा आणि नियम धाब्यावर बसवून कार्यरत असून त्या लाभ घेत आहेत.तसेच त्यांची योग्य पात्रता नसतानाही संस्थेने त्यांना पदोन्नौती देऊन मोठे बक्षीस दिल्याचे समजते.यावरुन मा.सहसंचालक ,कार्यालयाचे त्यांना पाठबळ असल्याचे दिसून येते.कारण अमरावतीच्या जिल्हा जात पडताळणी समितीने कवीश्वर आणि कुलकर्णी यांचे जात प्रमाणपत्र अवैद्य आणि जात प्रमाणपत्रासाठी केलेला दावा अवैद्य ठरविल्यानंतरही त्या कार्यरत आहेत.ही शासनासाठी आणि संस्थेला लाजीरवाणी बाब आहे.या दोघीना सदर संस्थेने 25 वर्षानंतर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती,अमरावती यांच्याकडे जात वैधता प्रमाणपत्र करीता प्रस्ताव सादर करण्यास सांगितले त्यानुसार त्यांची नियुक्ती खुल्या प्रवर्गातुन झाल्याने त्यांना प्रमाणपत्राची आवश्यकता नसल्याचे म्हटले आहे.जर कवीश्वर आणि कुलकर्णी यांची नियुक्ती खुल्या प्रवर्गातुन झाली असेल तर समितीकडे प्रस्ताव पाठविण्याची गरज काय ? असा प्रश्न ऊपस्थित होत आहे.जर उपरोक्त पद हे संस्थेच्या नामावली नुसार मागासवर्गीय उमेदवारासाठी राखीव असलेल्या भटक्या जमाती मधील (N.T.B.) या प्रवर्गासाठी राखीव होते तर दि.22/10/2013 रोजी याची नियुक्ती खुल्या प्रवर्गात कशी काय दाखविण्यात आली ? असा प्रश्न दि.09/08/2017 रोजी विद्यापीठाच्या मागासवर्ग कक्षातील मा.उपकुलसचिवांनी उपरोक्त महाविद्यालयाच्या प्राचार्याना विचारलेला असून उपरोक्त दोन्हीही विसंगत बाबीची शहानिशा आपल्या स्तरावर सदर महाविद्यालयाला करायला सांगितले होते.त्या नुसार अमरावतीच्या मा.संशोधन अधिकारी तथा सचिव यांचे दि.02/03/2017 रोजीचे पत्र रद्द करून पुन्हा जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याचे आदेश दिले होते.
सदर संस्थेने या दोघीची नियुक्ती मागासवर्गीय उमेदवारा करीता असलेल्या भटक्या जमाती मधून केल्याने आता आपल्याला भविष्य निर्वाह निधी मधून आर्थिक लाभ घेता येणार नाही या भीतीने कवीश्वर आणि कुलकर्णी यांनी आनंद आणि अमेय या त्यांच्या मुलांच्या नावाने बनावट लग्नपत्रिका जोडुन GPF मधून 25 ते 30 लाख रुपये उचलले आहेत.ही अतिशय गंभीर बाब असून त्यांच्या एकाही मुलाचे लग्न झालेले नाही.हे विशेष आहे.
त्यामुळे त्यांची पाठराखण करत असलेल्या संस्थेची आणि कु.कवीश्वर आणि डॉ.सौ.कुलकर्णी यांच्या सर्व पदाची मान्यता ताबडतोब रद्द करून त्यांनी शासनाकडुन आताप्रर्यत घेतलेला आर्थिक लाभ परत घेण्याची मागणी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ.राजेश नाईक यांनी केली आहे.