शिरोळ प्रकल्प दोनचा स्नेहसंमेलन कार्यक्रम उत्साहात

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

शिरोळ: प्रतिनिधी  :

शिरोळ पंचायत समिती येथे शिरोळ प्रकल्प दोनचा स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिरोळचे नूतन गट विकास अधिकारी नारायण घोलप ,बालविकास प्रकल्प अधिकारी संगीता गुजर, सामाजिक कार्यकर्त्या स्वाती भापकर उपस्थित होत्या. यावेळी नशाबंदी मंडळाचे कोल्हापूर जिल्हा संघटक सुरेश सकटे  यांनी विविध लघु उद्योग कसे करता येतात. व्यसन म्हणजे काय आणि व्यसनांचे दुष्परिणाम याविषयी सविस्तर माहिती देऊन व्यसनापासून दूर राहण्याचे आवाहन केले.

स्वाती भापकर यांनी आजच्या धकाधकीच्या जीवनात आनंदाने कसे जगावे, हे विविध उदारणांव्दारे सांगितले.यावेळी गट विकास अधिकारी नारायण घोलप यांनी अशा उपक्रमातून स्वावलंबी होण्याचा प्रयत्न करावा ,असे आवाहन केले.या सर्व कार्यक्रमासाठी  बालविकास प्रकल्प अधिकारी सौ. संगीता गुजर यांचे मोलाचे सहकार्य मिळाले.तसेच प्रकल्पच्या सर्व सुपरवायझर यांचे अनमोल सहकार्य लाभले. या कार्यक्रमासाठी सर्व सेविका व मदतनीस यांनी कार्यक्रमात डान्स सादर केला.विशेष म्हणजे सर्वच सेविका व मदतनीस यांनी आपल्या वयाला मारो गोली असे म्हणत लहान होवून जगल्या.यावेळी सुपरवायझर सौ संगीता चावरे ,तिकोटी मॅडम ,सौ पूजारी , सौ पठाण , सौ. जिरगे उपस्थित होत्या.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. सूजाता गूरव व भारती कूरणे यांनी केले.

शिरोळ पंचायत समिती हाॅल मधील या कार्यक्रमास महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

Post a Comment

Previous Post Next Post