सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वसतीगृहांची जबाबदारी कोणाची?



 प्रेस मीडिया लाईव्ह

 सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांच्या वसतीगृहामध्ये अमली पदार्थ सापडल्या प्रकरणासंदर्भात चर्चा होत आहे. यापूर्वी विद्यापीठाच्या मुख्य इमारतीमध्ये अनियमित रॅप सॉंग प्रकरण घडले होते. या प्रकरणातील एक विद्यार्थी वसतिगृहात अवैधरित्या राहत होता . त्यावर अद्याप  पडदा पडलेला नाही.

 या दोन्ही प्रकरणांमध्ये सुरक्षा विभागाला दोषी धरण्यात येत आहे. परंतु दुसरी बाजू अशी, विद्यापीठाच्या वस्तीगृहांमध्ये अवैध किंवा अनियमित राहणारे विद्यार्थी व त्यांची तपासणी करणारे वसतीगृहांचे  रेक्टर यांबाबत कोठे बोलले जात नाही. फक्त सुरक्षा व्यवस्थेला दोष  देण्यात येतो. मुला-  मुलींच्या प्रत्येक वसतिगृहाला एक रेक्टर नेमलेला असतो. या रेक्टरने अवैध विद्यार्थी अथवा अनियमित घडणाऱ्या बाबींवर देखरेख करण्याची जबाबदारी असते. परंतु या रेक्टर नामक अधिकाऱ्याबद्दल कोणीच कसे बोलत नाही? आणि वस्तीगृहांमध्ये राहणाऱ्या अवैध किंवा अनियमित विद्यार्थ्यांची जबाबदारी किंवा घडणारी प्रकरणे यांचे खापर सुरक्षा व्यवस्थेवर फोडले जाते. रॅप सॉंग प्रकरण व अमली पदार्थ प्रकरण यामध्ये वसतिगृहांचा अधिकारी  असलेल्या संबंधित रेक्टरची चौकशी व्हावी.

Post a Comment

Previous Post Next Post