कला, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांना 'ग्लोबल आयकॉन्स ऑफ इंडिया' 2024 पुरस्कार जाहीर

 - लढताना अपंगत्व आलेले भारतीय लष्करातील जवान सदाशिव घाडगे यांना विशेष पुरस्कार

- समीर चौघुले, हार्दिक जोशी, हर्षद अत्तकरी, सुरूची अडारकर - रानडे, चिन्मय उदगीरकर, योगेश शिरसाट, मिलिंद शिंत्रे,आरजे संग्राम यांचा होणार सन्मान

प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : कशिश सोशल फाउंडेशनच्या वतीने ' ग्लोबल आयकॉन्स ऑफ इंडिया' या पुरस्काराने  विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान करण्यात येतो. या  पुरस्कार सोहळ्याचे यंदा पाचवे वर्ष आहे. यामध्ये चित्रपट सृष्टीसह फॅशन, बिजनेस, डॉक्टर,पत्रकार, समाजकार्य  अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना यंदा  पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार आहे. दरवर्षी प्रमाणे या पुरस्काराच्या माध्यमातून जमा होणारा निधी सामाजिक उपक्रमांसाठी वापरला जाणार आहे, अशी माहिती कशिश सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष आणि पुण्याचे 'पॅड मॅन'  योगेश पवार यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

पुणे श्रमिक पत्रकार भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेला 'पॅड मॅन'  योगेश पवार यांच्यासह शो डायरेक्टर पूजा वाघ, अलविरा मोशन एन्टरटेनमेंट च्या दीपाली कांबळे, पिया कोसुंबकर आदी मान्यवर उपस्थित होते.  हा पुरस्कार सोहळा येत्या 19  मे  2024  रोजी एलप्रो सभागृह,  एलप्रो मॉल , चिंचवड येथे सायंकाळी 7 वा. होणार असून या पुरस्कारांचे वितरण अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, सूर्यादत्ता ग्रुपचे चेअरमन डॉ. संजय चोरडिया, सुषमा चोरडिया यांच्या हस्ते होणार आहे. 


पुढे बोलताना योगेश पवार म्हणाले,आम्ही सातत्याने महिलांच्या आरोग्या विषयीचे विविध उपक्रम राबवित असतो. या शो मधून जमा होणारा निधी महिलांच्या आरोग्यविषयक जनजागृती मोहिमेसाठी वापरला जाणार आहे. यंदाच्या पुरस्कारांसाठी आमच्या मान्यवर निवड समितीच्या वतीने सेलेब्रिटींची निवड करण्यात आली आहे, यामध्ये  सुप्रसिद्ध हास्य अभिनेता समीर चौघुले, अभिनेता हार्दिक जोशी, चिन्मय उदगीरकर, हर्षद अत्तकरी, अभिनेत्री सुरूची अडारकर - रानडे,  चला हवा येऊ द्या फेम योगेश शिरसाट, लेखक दिग्दर्शक मिलिंद शिंत्रे आणि आरजे संग्राम  यांना  'ग्लोबल आयकॉन्स ऑफ इंडिया' 2024  पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार आहे, तर भारतीय लष्करात देशसेवेचे कर्तव्य बजावत असताना अपंगत्व आलेले जवान सदाशिव घाडगे यांचा विशेष पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post