पुणे शहरतील सगळ्या होर्डिंगचे ऑडिट करण्याचे आयुक्तांनी आदेश दिले


प्रेस मीडिया लाईव्ह :

मुंबईत घडलेल्या घटने नंतर पुणे महानगरपालिका आता सावध झाली आहे. पुणे आयुक्तांनी  शहरतील सगळ्या होर्डिंगचे ऑडिट करण्याचे  आदेश दिले आहेत. शहरात एकूण 2500 होर्डिंगस असल्याची माहिती पुणे महापालिका आयुक्तांनी दिली आहे. जर अनधिकृत असेल तर त्याच लायसन्स रद्द करून कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

2500 परवानग्या आहेत तेवढेच अधिकृत होर्डिंगस असून अनधिकृत असेल तर गुन्हा दाखल करण्याचे आदेश देखील आयुक्तांनी दिले आहेत. शहरात एकूण 2598 अधिकृत होर्डिंगस आढळले आहेत. तर 2300 होर्डिंगसचं ऑडिट झालं आहे. एकूण 1564 अनधिकृत होर्डिंगसवर पुणे महानगरपालिकेची कारवाई करण्यात आली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post