झोपेचे सोंग घेतलेला पोलीस आयुक्त .


प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : कंट्रोल रुमला माहिती दिली नाही म्हणून अमीतेश कुमार यांनी दोन अधिकाऱ्यांना बडतर्फ केले ही आश्चर्य कारक बातमी आहे. पोलीस कार्यपद्धतीत अश्या मोठ्या अगर किरकोळ घटना कळविण्याची अजिबात गरज नसते. प्रत्यक पोलीस स्टेशन, सर्व मोबाईल गाड्या,मोटार सायकल मोबाईल गाड्या,येसिपी, डीसिपी, अडिशणल सीपी, जॉइंट सिपी ,सिपि यांच्या गाड्या मध्ये वायर लेस सेट/ मोबाईलसेट असतात. लक्ष ठेवण्यासाठी ऑपरेटर असतो . नियमितपणे शक्यतो प्रत्येक तासाला या गाड्यांचे व अधिकाऱ्यांचे लोकेशन कंट्रोल रूम कडून विचारले जाते. त्यांच्या हद्दीत काही कमी जास्त आहे का  विचारले जाते. त्याची नोंद कंट्रोल रूम रजिस्टर मध्ये केली जाते. आता तर हे संभाषण ऑटोमॅटिकली नोंदले जाते.असे असताना रात्री अडीच वाजता घडलेल्या भीषण गुन्ह्याची माहिती पोलीस कंट्रोल रूमला कशी मिळाली नाही ? 

प्रत्येक पोलीस स्टेशन मध्ये एक रात्र गस्तीसाठी अधिकारी नेमलेला असतो. तसेच सर्व पुणे शहरासाठी डीसीपी दर्जाचा आयपीएस अधिकारी नेमलेला असतो. त्या दिवशी गिल नावाचे अधिकारी  नेमलेले होते. त्यांना ही घटना कधी समजली? त्यांनी काय कारवाई केली? पोलीस आयुक्तांना का कळविले नाही?  त्या हद्दीतील एसीपी, डीसीपी तसेच ॲडिशनल सीपी यांनी घटनास्थळाला भेट दिली नव्हती का? डीसीपी, ऍडिशनल सीपी तसेच  सी पी अमितेश कुमार यांच्या गाड्या रात्री सुद्धा त्यांच्या निवासस्थानी असतात. त्यावर ड्रायव्हर वायरलेस ऑपरेटर तैनात असतात त्यांची जबाबदारी असते की महत्त्वाची घटना संबंधित अधिकाऱ्याला कळवलीच पाहिजे. आयुक्तांचे काम नऊ ते पाच असे कार्यालयातील हेड क्लार्क सारखे नसते. शिवाय त्या रात्री पोलिस आयुक्त यांना इतर कोणतीही महत्त्वाची कामगिरी नव्हती.  प्रत्येक वरिष्ठ अधिकाऱ्याला सरकारतर्फे मोबाईल पुरवलेला असतो. अडचणीत असलेला सामान्य माणूस, पोलीस कर्मचारी हा पोलिस आयुक्तांना रात्री अपरात्री फोन करू शकतो व त्याची दखल घेणे पोलीस आयुक्त यांना बंधनकारक असते. ती त्याची शासकीय, नैतिक व सामान सामाजिक जबाबदारी असते. घडलेल्या कार घटनेची माहिती मिळण्याचे  सगळे मार्ग उपलब्ध असताना पोलिस पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना या भीषण गुन्ह्याची माहिती का मिळू शकली नाही याचे कारण पोलीस आयुक्तांनी जाहीर करावे. तसेच गृह खात्याने जाहीर करावे.  माहिती मिळूनही पोलीस आयुक्त आपल्या बेडरूम मधून बाहेर का पडले नाहीत अगर पडू शकले नाही याचेही कारण जाहीर करावे.

 कनिष्ठ कर्मचाऱ्यांना  चूक असल्यास जरूर सस्पेंड करावे. पण पोलीस आयुक्त पदातून मिळणारा मलिदा खाण्यासाठी पोलीस आयुक्त पुढे असतात आणि जबाबदारी आली की  कनिष्ठ कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना सस्पेंड करण्यासाठी वापरले जाते असा मेसेज जनतेमध्ये जातो.

नागपूर वरून आलेल्या व अदृश्य दिव्य शक्तीचा हात पाठीवर असलेले अमितेश कुमार उंच उंच शिखरावर  जातील.पण कनिष्ठ कर्मचाऱ्यांच्या मनोधैर्यावर, मॉरलवर फार वाईट परिणाम झाला त्याचे काय? आम्हा पुणेकरांच्या सुरक्षिततेचे काय? झोपेची सोंग घेतलेल्या या पोलीस आयुक्त व त्यांच्या पाठीशी असलेल्या दिव्यशक्तीला जागे करण्यासाठी वेगळे ढोल आणावे लागतील हेच खरे!

सुरेश खोपडे

Post a Comment

Previous Post Next Post