ससून रुग्णालय आहे की 'गुन्हेगारांना वाचवणारा अड्डा' - विजय वडेट्टीवार

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

 पुणे  : ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी पुण्याच्या आरोपीला वाचवण्यासाठी चक्क ब्लड रिपोर्ट मध्ये फेरफार केली. हे ससून हॉस्पिटल गुंड आरोपी यांच्यासाठी आहे का ? ललित पाटील प्रकरणापासून या हॉस्पिटलच्या कारभारावर आधीच शंका होती, पण सरकार आणि रुग्णालय प्रशासनाने ह्या शंकेवर शिक्कमोर्तब केले. या सर्व प्रकारामुळे जनतेचा  हॉस्पिटल व डॉक्टर यांच्यावरील विश्वास कमी होत चालला आहे. 

पुणे 'हिट अँड रन' प्रकरणात पूर्ण व्यवस्थेने आरोपीला मदत केली आहे. दारू पिऊन दोन लोकांची हत्या करणाऱ्याला मदत करण्यासाठी किती जणांनी मेहनत घेतली हे समोर येत आहे. या सर्वांना कठोर शिक्षा व्हायला हवी. म्हणून आम्ही न्यायिक चौकशीची मागणी करत आहोत. आता पोलिस ते हॉस्पिटल सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे," असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

Post a Comment

Previous Post Next Post