अश्विनी व अनिश यांना न्याय मिळालाच पाहिजे!

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

पुण्यातील कल्याणीनगर परिसरात घडलेल्या दुर्घटनेत दोन निष्पाप जीवांचे गेलेले बळी व या दुर्घटनेतील आरोपीला पोलीस प्रशासनाकडून मिळालेली वागणूक यामुळे समस्त पुणेकरांच्या मनात पोलीस प्रशासनाच्या विरोधात प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. करोड रुपयांच्या भ्रष्टाचारातून संबंधित प्रकरण दाबण्यासाठी सत्ताधारी व पोलीस प्रशासन काम करत असून या प्रकरणातील निष्पाप जीवांना न्याय मिळवून देण्यासाठी समस्त पुणेकर, युवक काँग्रेस व अक्षय जैन मित्र परिवाराच्या वतीने काढण्यात आलेल्या कॅन्डल मार्चमध्ये सहभागी झालो.

पुण्यनगरीच्या वैभवशाली संस्कृतीला काळीमा फासणारी ही घटना असून या घटनेतील तपासादरम्यान पोलीस अधिकाऱ्यांनी पैशांच्या दबावाखाली आरोपीला दिलेल्या सहानुभूतीच्या विरोधात व पुण्यातील अवैद्य पब संस्कृतीला हद्दपार करण्यासाठी आम्ही हा लढा उभारलेला आहे.

या दुर्दैवी दुर्घटनेत मृत पावलेल्या अश्विनी व अनिश यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!


#puneaccident 

#justicefor_avnishashvini

#RavindraDhangekar

Post a Comment

Previous Post Next Post