मशिदीचा पावित्र्य पुण्यातच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये ठेवला जातो.

राज ठाकरे व हिंदुत्ववादी संघटनांना खुले आव्हान मुस्लिम धर्मगुरूंनी मशिदीतून फतवा काढले याचे पुरावा द्या 

नुकताच सोशल मीडियामध्ये एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. 

प्रेस मीडिया लाईव्ह : 

विशेष प्रतिनिधी : अंजुम इनामदार :

पुणे : हिंदुत्ववादी संघटना व राज ठाकरे यांचे असे म्हणणे आहे की सदर व्हिडिओ एका मशिदीचा आहे आणि त्या मशिदीतून मुस्लिम धर्मगुरू काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतदान करण्यासाठी फतवा दिला आहे. फतवा बाबत चुकीची माहिती समाज माध्यमाद्वारे फिरत असल्याचे दिसत आहे. 

वास्तविक पाहता सदर वायरल व्हिडिओ हा 2 मे 2024 रोजी कोंडवा येथे झालेल्या एका कार्यक्रमाचा आहे. सदर कार्यक्रम मशिदीत झाला नसून तर कौसर बाग ग्राउंडवर जाहीर सभा झाली होती. या कार्यक्रम मध्ये नेरळ येथील मोलाना सज्जाद नोमानी यांचे प्रमुख मार्गदर्शन होणार होते या कार्यक्रमाचा विषय होता "मौजूदा हालात और हमारी जिम्मेदारीयां"( सध्या स्थिती व आपली जबाबदारी) असा विषय कार्यक्रमचा होता. कोंढवा भागातील एक संघटना ( कुल जमाती तांझीम ) या कार्यक्रमाचे आयोजक होते. सदर कार्यक्रम मशिदीत न घेता एका ग्राउंड वर झाले होते. कुल जमाती तांजीम आयोजीत व्हायरल व्हिडिओमध्ये सूत्रसंचालन करणारे व्यक्तींचा नाव उस्मान हिरोली आहे. 1997 साली उस्मान हिरोली हे काँग्रेस पक्षाचे नगरसेवक म्हणून निवडून आलेले होते. 97 साली पुणे येथे शिक्षण मंडळाचे सदस्य ही होते व काँग्रेस पक्षाचे अनेक पद भूषविले आहे. कदाचित काँग्रेस पक्षामध्ये पुन्हा माझे स्थान राहावे व मी काँग्रेस पक्षासाठी काहीतरी करतो मी पक्षासाठी काम करतो व पक्षाने माझ्यासाठी काहीतरी करावे असे दाखविण्याचे उद्दिष्ट असण्याची शक्यता नाकारता येत नाही. ऐन निवडणुकीच्या काळात त्यांनी घाई गडबडीत कार्यक्रम घेऊन सदर कार्यक्रम मध्ये कुल जमाती तांझिम या सामाजिक संघटनेच्या वतीने अमोल कोल्हे, सुप्रियाताई सुळे, संजीव वाघिरे, रवींद्र धंगेकर यांना आम्ही जाहीर समर्थन करीत आहोत अशी घोषणा केली. घोषणा करणारे व्यक्ती तो मुस्लिम धर्माचा धर्मगुरू नाही याचीही नोंद आपण घेतली पाहिजे.

यापूर्वी देखील 26 मार्च 2024 रोजी पुणे कोंडवा सिटी लॉस या ठिकाणी जमियत ओलेमा हिंद या संघटनेचा कार्यक्रम झाला होता. सदर संघटनाने सुद्धा याच चार उमेदवारांना लोकसभेत निवडून द्यावा याकरिता अधिकृत घोषणा करून जाहीर पाठिंबा देण्यात आले होते. तोही कार्यक्रम कोणत्याही मशिदीत झाले नसून तर एका लॉन्स मध्ये झाले होते. जमीयात ओलेमा हिंद हे राष्ट्रीय पातळीवर काम करणारी मुस्लिम समाजाची मोठी संघटना आहे व या संघटनाचे राष्ट्रीय अध्यक्ष 10 वर्षांपूर्वी काँग्रेस पक्षाच्या मदतीने राज्यसभेचे खासदार राहिलेले आहे. 

या दोन्ही कार्यक्रमाचा परिणाम पुण्यात असे झाले की जसे पुण्यातील सर्व मशिदीमधून लोकसभा 2024 मुस्लिम धर्मगुरू या चारीही उमेदवारांना पाठिंबा देण्यासाठी मशिदीतून फतवा काढत आहे असे काही दिशाभूल करणारे खोटे वक्तव्य सोशल मीडिया इलेक्ट्रॉनिक व प्रिंट मीडियाच्या माध्यमातून व्हायरल होत आहे.

या व्हिडिओचा परिणाम म्हणून काल झालेल्या राज ठाकरे यांची सभेत सुद्धा त्यांनी मशिदीतून फतवा काढत असल्याची खोटी माहिती जाहीर सभेतील दिली.

हिंदूंचे मतं मिळत नसल्यामुळेच काहीतरी स्टंट करून मतं मिळविण्याची तुमची हे खेळी खूप जुनी आहे.

राज ठाकरे व हिंदुत्ववादी संघटनांना आमचा असं म्हणणे आहे की मशिदीचा एक पावित्र्य  असतो 1947 पूर्वी देशाच्या स्वतंत्र्याची लढाईसाठी अंग्रेजाविरुद्ध लढाईसाठी फतवे निघत होते. 

मात्र देश स्वतंत्रतानंतर आज रोजी पर्यंत देशातील एकाही मशिदीतून कोणत्याही राजकीय पक्षाला किंवा एखाद्या उमेदवाराला निवडून द्यावा याकरिता मशिदीतून फतवा काढला गेलेला नाही. राज ठाकरे व हिंदुत्ववादी संघटनांना खुले आव्हान करतो की एक उदाहरण त्यांनी देशात दाखवावा मशिदीतून उमेदवार निवडून द्यावा यासाठी फतवा काढला गेलेला आहे. आम्ही पाहिजे ते पैज शरत लावण्यासाठी तयार आहोत तुम्ही तयार आहात का आमचा चॅलेंज स्वीकारण्यासाठी.


अंजुम इनामदार 

अध्यक्ष मुलनिवासी मुस्लिम पुणे 

9028402814

Post a Comment

Previous Post Next Post