प्रेस मीडिया लाईव्ह :
एकीकडे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी खोटं प्रेम दाखवून डॉ. जितेंद्र आव्हाड यांना पुढे करून मनुस्मृती वरील लक्ष हटविण्याचा प्रयत्न होत आहे तो आम्ही होऊ देणार नाही. इयत्ता तिसरी ते दहावी पर्यंतच्या पाठ्यक्रम शालेय शिक्षण विभागाकडून तयार केलेला असून यामध्ये मनुस्मृतीच्या श्लोकांचा समावेश अभ्यासक्रमात केल्याने पुन्हा एकदा चातुवर्ण्य, अंधश्रद्धा याला खतपाणी घालण्याचे व समाजा-समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणानुसार,राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था यांचे मार्फत होत आहे.
या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये हे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत,ही सर्वमान्य समाज भावना प्रतिकात्मकरित्या सरकारला समजावी,यासाठी आज महात्मा गांधी चौक लातूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने मनुस्मृतींच्या प्रतिमांचे पत्रक फाडून आंदोलन करण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादी युवक प्रदेश उपाध्यक्ष ॲड.निशांत वाघमारे,ॲड.शेखर हविले,बक्तावर बागवान,ॲड.इरफान शेख,चंद्रशेखर कत्ते,डी.उमाकांत,फेरोज पठाण,राहुल ढाले,अनिल विरेकर,बसवेश्वर रेकुळगे,रघुनाथ मदने,प्रविण सांळूंके,आदर्श उपाध्ये,अंतेश्वर शितोळे,शंकर घोडके,पृथ्वीराज कापसे,शाहरुख पठाण यांच्यासह अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar Jitendra Awhad Supriya Sule Rohit Rajendra Pawar Jayant Patil - जयंत पाटील Mahadev Balgude Mahebub Shaikh Ravikant Varpe Sharad Pawar Sakshna Salgar अमित म्हा. सुरवसे Yogesh Sawant Mohasin A. Shaikh Abhijeet Pawar @highlight
#लढू_आणि_जिंकू #शरदचंद्रजी_पवार_साहेब