हीट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपीवर सोनाली तनपुरे यांनी केले गंभीर आरोप

  


प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे हीट अँड रन प्रकरणी पुणे पोलिसांनी कारवाई तीव्र केली आहे. या प्रकरणी राजकीय आरोप प्रत्यारोप देखील झाले आहेत ,  काल राहुल गांधी यांनी देखील काल व्हिडिओ पोस्ट करत मोदी सरकारवर टीका केली. असे असतांना आता सोनाली तनपूरे यांनी ट्विट करत गंभीर आरोप केले आहे. सोनाली तनपूरे यांनी या प्रकरणी आरोपीचे थेट नाव घेतले नसले तरी त्यांचा सर्व रोख हा बिल्डरच्या आरोपी मुलाकडे आहे.

सोनाली तनपुरे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, कल्याणीनगर येथील कार अपघातानंतर पुन्हा एकदा त्या गोष्टी आठवल्या. संबंधित घटनेतील मुलगा हा माझ्या मुलासोबत एकाच वर्गात शिकत होता. त्यावेळी त्यापैकी काही मुलांकडून माझ्या मुलाला खूप त्रास झाला होता. या मुलांची तक्रार मी त्यांच्या पालकांकडे केली होती. मात्र, योग्य तो प्रतिसाद मिळाला नाही, असे सोनाली तनपूरे यांनी म्हटले आहे.

सोनाली तनपुरे यांनी लिहिले आहे की, या मुलांच्या त्रासाला कंटाळून त्यांना त्यांच्या मुलाची शाळा बदलावी लागली. या घटनेचा वाईट परिणाम आजही त्याच्या मनावर असून वाईट प्रवृत्ती असणाऱ्या मुलांची दखल वेळीच शाळेने किंवा पालकांनी घेतली असती तर आज असा भयंकर गुन्हा कदाचित घडला नसता. त्यादिवशी झालेल्या अपघातात सुशिक्षित तरुण तरुणीचा निष्पाप बळी गेला नसता. त्यांची कुटुंबे उद्ध्वस्त झाली. या कुटुंबांना न्याय मिळायला हवा, असे सोनाली तनपुरे यांनी म्हटले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post