रक्ताचे नाते चॅरिटेबल ट्रस्ट' तर्फे महिलांची मोफत कर्करोग तपासणी

  

प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : रक्ताचे नाते चॅरिटेबल ट्रस्ट,लायन्स क्लब (सहकारनगर) आणि लायन्स राहतेकर वूमन कॅन्सर डायग्नॉस्टिक सेंटर(एल आर सी सी) यांच्यातर्फे स्त्री रोग तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित शिबिरात महिलांची मोफत कर्करोग तपासणी करण्यात आली .शनिवार,दि.२५ मे २०२४ रोजी सकाळी १० ते २ यावेळेत मामलेदार कचेरी समोर हे शिबीर पार पडले. 'रक्ताचे नाते चॅरिटेबल ट्रस्ट' च्या नवीन कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने हे शिबीर आयोजित करण्यात आले.

शिबिराच्या उदघाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी १२५ वेळा रक्तदान करणारे प्रदीप कपिले हे होते. त्यांनी आपल्या इच्छाशक्तीने कॅन्सर वर मात केली आहे.सौ.निर्मलाताई हेडा आणि सत्यविजय  हेडा यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.'महिलांमधील कॅन्सरचे  प्रमाण वाढत  असल्याने वेळीच तपासणी करून घ्यावी.दर पंधरा दिवसांनी असे तपासणी शिबिर घेण्यात येणार आहे.पुढील शिबिर ९ जून रविवारी होणार आहे',असे 'रक्ताचे नाते ट्रस्ट 'चे अध्यक्ष राम बांगड यांनी यावेळी सांगितले.

श्री मुरलीधर महिला मंडळाचे सहकार्य शिबीर आयोजनात लाभले. राम बांगड,चंद्रकला बांगड,पद्मा झंवर यांच्यासह अनेक मान्यवर उदघाटन प्रसंगी उपस्थित होते.या शिबिरात १०० महिलांची तपासणी करून त्यांना मोफत सल्ला देण्यात आला. महात्मा फुले मंडळाचे अध्यक्ष   मधुकर राऊत यांनीही यावेळी मार्गदर्शन केले.  



Post a Comment

Previous Post Next Post