अपघातातील मुख्य आरोपी वेदांत विशाल अग्रवाल याची सखोल चौकशी करून पुणे शहरातील बोकाळलेल्या पबला आळा घालण्यात यावा --- साईनाथ संभाजी बाबर

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : कल्याणीनगर मध्ये भरधाव वेगाने गाडीच्या धडकेत दोन जणांचा मृत्यु झाल्याची धक्कदायक धटना रविवारी पहाटे घडली.आपल्या कडून कायदेशीर कार्यवाही पण झाली गुन्हा नोंद झाला तपास सुरू राहील अशीच माहिती सामान्य जनतेसमोर आहे परंतु या घटनेने पुणेकरांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

या घटनेतील मुख्य आरोपी वेदांत विशाल अग्रवाल हा अल्पवयीन असून पब मध्ये पार्टी करून बाहेर  पडल्यानंतर अपघात झालेला आहे 

बेदरकारपणे वाहन चालवून दोन मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या आरोपीने मद्य पिलेले होते असे समजते त्याचा या हयगयीमुळेच अपघात झाल्याचे सकृत दर्शनी दिसत आहे. या अपघातात मोटार वाहन अधिनियम १९८८ मधील तरतुदी नुसार कार्यवाही व्हावी तसेच या अल्पवयीन मुलाला वाहन चालवण्यास देणाऱ्या पालक श्री विशाल अग्रवाल यांच्यावर  पण पुढील कायदेशीर कार्यवाही करून गुन्हा दाखल करणे अपेक्षीत आहे  परंतु आरोपी मोठ्या बांधकाम व्यवसाईकाचा मुलगा असल्याने त्याला चांगली वागणूक दिल्याचे वर्तमान पत्रातील बातम्यांवरून दिसते सदरील बाब पुणेकरांच्या दृष्टीने गंभीर आहे.

      कल्याणी नगर मध्ये असे अनेक पब रेस्टोरंट हॉटेल यामध्ये दररोज अश्याच प्रकारे अल्पवयीन मुले मुली मद्य पिऊन थिरकत असतात सांस्कृतिक पुणे शहराची संस्कृती नामशेष करण्याचे अनेक चाळे तरुणाईकडून सुरू आहेत परंतु पोलीस प्रशासन जाणीव पूर्वक दुर्लक्ष करीत आहेत याची खंत वाटते.या परिसरातील पब मध्ये मद्याबरोबर अमली पदार्थाची पण पार्टी चालत असल्याच्या बातम्या वर्तमान पत्रातून येत असतात या परिसरातील पबला रेस्टोरंन्टला सर्व नियमांचे वेळेचे बंधन वेळीच घालणे गरजेचे आहे.

    सदरच्या पत्राद्वारे आपणांस मागणी करण्यात येते कि या प्रकरणातील दोन बळी घेणाऱ्या आरोपीची सखोल चौकशी करावी जबाबदार पालकांवर गुन्हा दाखल करण्यात यावा,चालवत असलेल्या वाहनांची नोंदणी रद्द करण्यात यावी तसेच पुणे शहरातील सर्व पब रेस्टोरंट नियमांचे पालन करीत नाहीत अश्या मालकांवर कायदेशीर गुन्हे दाखल करून पुणेकरांना सुरक्षीत जीवन जगता यावे याची खबरदारी घ्यावी. हि नम्र विनंती.




साईनाथ संभाजी बाबर 

पुणे शहर अध्यक्ष

Post a Comment

Previous Post Next Post