प्रेस मीडिया लाईव्ह :
थायलंड मधील शिनावत्रा विद्यापीठाने इंडो- थाई प्राईड ऑफ एज्युकेशन पुरस्कारांतर्गत बेस्ट कॉन्ट्रीब्यूटर अवॉर्डकरिता डॉ. तुषार निकाळजे या सेवानिवृत्त शिक्षकेतर - कर्मचाऱ्याची निवड केली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे येथे ३२ वर्षे शिक्षकेतर- कर्मचारी म्हणून सेवा करीत असतानाच डॉ. तुषार निकाळजे यांनी एम फिल, पीएच डी शिक्षण पूर्ण केले.
आजपर्यंत त्यांनी वर्तमानपत्र, साप्ताहिके, मासिके, विद्यापीठ अनुदान आयोग मान्यता प्राप्त रिसर्च जर्नलमध्ये 84 लेख प्रकाशित केले आहेत, 14 पुस्तके लिहून प्रकाशित केली आहेत. यापैकी दोन पुस्तकं महाराष्ट्रातील नव विद्यापीठे व तीन स्वायत्त महाविद्यालयांच्या बी ए व एम ए अभ्यासक्रमांना संदर्भ पुस्तक म्हणून मान्यता प्राप्त आहेत. दृष्टीहीन व्यक्तींकरिता अंडरस्टँडिंग द युनिव्हर्सिटी हे ब्रेल इंग्रजी पुस्तक लिहून प्रकाशित केले आहे. या पुस्तकाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये झाली आहे.
डॉ. निकाळजे मार्च 2022 मध्ये सेवानिवृत्त झाले आहेत. परंतु सेवानिवृत्तीनंतरही ते शैक्षणिक व संशोधन कार्यात व्यस्त आहेत. गेल्या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी तीन पुस्तके व 14 लेख लिहून प्रकाशित केले आहेत. वर्ष 2023 मध्ये गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये लेखक व संपादक म्हणून नोंद झालेली आहे. दोन डॉक्युमेंटरी फिल्मदेखील प्रदर्शित केल्या आहेत. यातील "क्लर्क टू वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर" या डॉक्युमेंटरीची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड व ब्रावो बुक ऑफ इंटरनॅशनल रेकॉर्ड, शारजा मध्ये झाली आहे. त्यांनी आजपर्यंत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चर्चासत्रामध्ये भाग घेतलेला आहे व शोधनिबंध सादर केले आहेत .
शासन व निवडणूक आयोग यांना प्रशासकीय सुधारणांबाबत प्रस्ताव सादर केले आहेत. डॉ. निकाळजे सेवानिवृत्तीनंतरही शैक्षणिक व संशोधनात्मक, तसेच सामाजिक कार्यात कार्यरत आहेत डॉ. निकाळजे यांना आजपर्यंत दिल्ली, पंजाब, राजस्थान, शारजा, वर्ल्ड रेकॉर्ड युनिव्हर्सिटी, लंडन, अमेरिका, चेन्नई, गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड, लंडन इत्यादी 15 शैक्षणिक व संशोधनात्मक पुरस्कार मिळाले आहेत. डॉ. निकाळजे यांनी उच्च शिक्षण , संशोधन, पुस्तक व लेख लिहीणे, प्रकाशित करणे ही सर्व कामे स्वखर्चाने केलेली आहेत. डॉक्टर तू सांग काळजी यांच्या उच्च शिक्षण व संशोधनात्मक कार्याची दखल थायलंड मधील शिनावात्रा विद्यापीठाने घेऊन त्यांना इंडो ताई प्राइड ऑफ एज्युकेशन अंतर्गत बेस्ट कॉन्ट्रीब्यूटर अवॉर्ड करिता निवड केली आहे दिनांक 29 मे 2024 रोजी थायलंड येथे होणाऱ्या कार्यक्रमात डॉ. निकाळजे यांना उपस्थित राहण्याची विनंती करण्यात आली आहे.
याप्रसंगी डॉ. तुषार निकाळजे म्हणाले,"आपण योग्य काम केले तरच त्याची पावती मिळते. माझ्या कामावर माझी श्रद्धा आणि विश्वास आहे. माझा हा शैक्षणिक व संशोधनाचा प्रवास भावी पिढीला प्रेरणा देणारा ठरेल असा माझा विश्वास आहे. प्रत्येकाने आपल्या देशाचा नावलौकिक वाढेल यासाठी प्रयत्न करावेत".