प्रेस मीडिया लाईव्ह :
आज पुणे बचाव समितीच्या वतीने पत्रकार भवन हॉल, गांजवे चौक, पुणे येथे विरोधी पक्षनेते मा.श्री.विजयजी वडेट्टीवार साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत व माजी वरिष्ठ पोलीस अधिकारी मा.श्री. सुरेश खोपडे, ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ ॲड. असीम सरोदे, जेष्ठ पत्रकार मा.विनिता देशमुख,निर्भय बनो चळवळीचे मा.श्री. विश्वंभर चौधरी यांच्या प्रमुख सहभागासह उपस्थित मान्यवर मंडळी व सुज्ञ जागरूक नागरिकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.
खरे पाहता गेल्या अनेक वर्षात पुण्याच्या वैभवशाली संस्कृतीला प्रशासकीय यंत्रणेकडून लागलेली कीड त्याचबरोबर वाढती गुन्हेगारी, कोयता गँग, महिला असुरक्षितता या आणि अशा अनेक घटना पुण्यासारख्या शहरात राजरोसपणे घडताना दिसतात.
कधी पोलीस प्रशासन तर कधी सत्ताधारी यंत्रणांकडून गुन्हेगारी क्षेत्राला पाठीशी घातले जाते. कल्याणीनगर परिसरातील घडलेल्या दुदैवी दुर्घटनेत दोन निष्पापांचा बळी गेला. आरोपीला मात्र पोलीस प्रशासनाकडून रेड कार्पेट टाकून घरी पोहोचवण्यात आले.
या संपूर्ण प्रकरणात पोलीस प्रशासन व सत्ताधाऱ्यांनी पैशाला बळी पडून केलेली सौम्य कारवाई, आरोपीला दाखवलेली सहानभूती पुणेकर जाणून आहेत. या तपास यंत्रणेतील अधिकाऱ्यावरती कठोर कारवाई व्हावी, अशी आम्हा सर्वांची मागणी आहे.
शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात वाढत चाललेली गुन्हेगारी क्षेत्राची दहशत आणि या दहशतीला सत्ताधाऱ्यांचे मिळणाऱ्या पाठबळ यामुळे पुणेकर जनतेत प्रचंड संताप निर्माण झालेला आहे.
पुण्यातील पब, अमली पदार्थ आणि बार संस्कृतीमुळे पुण्याचे जीवनमान अत्यंत खालावले आहे. तरुणींची सुरक्षितता व भविष्य अंधारात आहे. सावित्रीबाई फुले विद्यापीठातील उपस्थित वस्तीगृहात गांजा सापडणे ही देखील अत्यंत गंभीर बाब आहे.
या एकंदरीत संपूर्ण परिस्थितीचा विचार करता सुज्ञ पुणेकर जनतेने या लढ्यात सहभागी होत पुण्याच्या वैभवशाली संस्कृतीला, तिच्या वैभवाला जपण्यासाठी पुढे येण्याची गरज निर्माण झाली आहे. यावेळी सहभागी वक्त्यांनी आपापली मते मांडून पुणे शहराच्या भयान वास्तव परिस्थितीला आपल्यासमोर ठेवले.
यावेळी माझ्यासह मान्यवर मंडळी, सुज्ञ पुणेकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#dhangekar_pattern #RavindraDhangekar #रविंद्रधंगेकर