पोर्शेअपघात प्रकरणात अल्पवयीन मुलाच्या आईला अटक

 


प्रेस मीडिया लाईव्ह : 

पुणे पोर्शे हिट अँड रन प्रकरणातील अल्पवयीन मुलाचे वडील आणि आजोबानंतर आता पुणे पोलिसांनी आरोपीच्या आईला अटक केली आहे. रक्ताचे नमुने बदलल्याचा आरोप अल्पवयीन मुलाच्या आईवर आहे. आज अल्पवयीन आरोपीच्या आईला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. रक्ताच्या नमुन्यांमध्ये छेडछाड केल्याप्रकरणी  अटक करण्यात आली असून, त्याचा तपास गुन्हे शाखेकडून सुरू आहे. या प्रकरणी ससून रुग्णालयातील दोन डॉक्टर आणि एका वॉर्ड बॉयला पुणे पोलिसांनी यापूर्वीच ताब्यात घेतले आहे. रक्ताच्या नमुन्यात छेडछाड केल्याप्रकरणी आरोपीच्या वडिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अल्पवयीन मुलाचे रक्ताचे नमुने बदलण्यात आल्याची बातमी समोर आली. त्या बदल्यात जे रक्त दिलं गेलं ते त्याची आई शिवानी अग्रवाल यांचं होतं का? त्यांनी कुणाला फोन करुन मुलाला वाचवण्यासाठी मदत मागितली, अपघाताचा कलंक कुणाला डोक्यावर घेण्यास सांगितलं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता पोलीस त्यांना चौकशीदरम्यान विचारु शकतात. रक्ताच्या नमुन्यांमध्ये फेरफार केल्याचं प्रकरण समोर आल्यानंतर शिवानी अग्रवाल बेपत्ता झाल्या होत्या. मात्र पुणे पोलिसांनी त्यांना अटक केली. अपघातानंतर तीन दिवसांनी रॅप साँग गाणाऱ्या एका मुलाचा व्हिडीओ चर्चेत आला होता. हा व्हिडीओ सदर अल्पवयीन मुलाचा आहे हे समजून त्याला ट्रोल करण्यात आलं होतं. त्यानंतर शिवानी अग्रवाल कॅमेरासमोर आल्या आणि ढसाढसा रडत रॅप साँगमधला तो मुलगा माझा नाही असं सांगितलं होतं. त्यावेळीही त्या चर्चेत आल्या होत्या.

Post a Comment

Previous Post Next Post