प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक मुलाच्या पोर्शे कार अपघात प्रकरणातील आरटीओ आणि पोलीस स्टेशन मधील सीसीटीव्ही फुटेज नागरिकांसाठी उपलब्ध करून देणेत यावीत अशी मागणी आप तर्फे करण्यात आली आहे.
पॉर्शे कार बाबत चे नव नवीन प्रकार समोर येत आहेत, एका बांधकाम व्यावसायिकाला वाचवण्यासाठी सर्व सरकारी संस्थाचा मोठ्या प्रमाणात गैर वापर होत आहेत. विशेष बाब म्हणजे या प्रकरणात महाराष्ट्रातील भाजप च्या वरिष्ठ नेत्यांच्या प्रतिक्रिया आणि समाज माध्यमात खोट्या माहिती दिल्या जात आहेत.
आम आदमी पार्टी ची मागणी आहे की पॉर्शे कार जर नोंदणीसाठी आरटीओ* मध्ये गेली होती तर त्याचे *सीसीटीव्ही व्हिडिओ रेकॉर्डिंग* जनतेसाठी उपलब्ध करून द्यावेत.
वडगाव शेरी चे *आमदार सुनील टिंगरे* यांनी पोलिस स्टेशन मध्ये जाऊन अधिकाऱ्यांशी काय चर्चा केली याची *सीसीटीव्ही व्हिडिओ रेकॉर्डिंग* उपलब्ध करून द्यावी.
आम आदमी पार्टी ने या दोन्ही विषयाची माहिती मिळावी म्हणून RTI अर्ज केला आहे.
श्री सुदर्शन जगदाळे
पुणे शहराध्यक्ष
आम आदमी पार्टी
९५२७९११९११