प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे लोकसभा निवडणुकीचे मतदान करताना मतदारांमध्ये उत्साह दिसून येत नव्हता , मतदारांचा कोणत्याच नेत्यावर विश्वास राहिलेला नाही असे चित्र दिसून येत होते , जनता महागाईने होरफळून निघाली आहे . या निवडणुकीत भाजप व अन्य पक्षांसाठी निवडणूक जिंकणे तेवढे सोपं नाहीये , काहींचे तर डिपॉझिट जप्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही , यावेळी प्रचारात विविध पक्षांनी आरोप प्रत्यारोप करून सभा गाजवून सोडल्या , पण मतदारांचा कौल आमदार रवींद्र धंगेकर यांचे कडे असल्याचे दिसून येत आहे
शिवाजीनगर आणि पुणे कैन्टोन्मेंट मतदारसंघात मुस्लिम समाजाची एक गट्ठा मते निर्णायक ठरणार आहे, पर्वती मतदारसंघात ५०.५० टक्के दोन्ही उमेदवारांसाठी स्थिती ही राहणार आहे, वंचितने गेल्या वेळी मिळावलेली ६४ हजारांची मते या वेळी घसरणार आहेत, असे चित्र आहे. साधारणपणे वंचितची मते ही ३० ते ३५ हजारांपयंत असणार आहेत. एमआयएमचे अनिस सुंडके यांचा प्रभाव जाणवला नाही.
जनतेला आता खासदार जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी जनतेची काम करणारा असावा अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे , भाजपचे मुरलीधर मोहोळ यांच्यावर ब्राह्मण मतदारांची नाराजी या ठिकाणी स्पष्टपणे दिसून आली त्यामुळे मुरलीधर मोहोळ यांना अपेक्षेप्रमाणे मतदान झाले की नाही ती शंका वाटते मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारामध्ये आक्रमकपणा दिसून येत होता उलट रवींद्र धंगेकर यांचा प्रचार संत गतीने सुरू होता नंतर तो जोर धरू लागला होता. रवींद्र धंगेकर व मुरलीधर मोहोळ यांच्यातच खरी रंगतदार लढाई होणार हे स्पष्ट आहे . पण धंगेकर यांचेच पारडे जड असल्याचे दिसून येत आहे
काँग्रेस कडून काही चुका....
निवडणूक प्रचार सुरू झाल्यानंतर काँग्रेस पक्षाकडून प्रसार माध्यमाचे जबाबदारी ज्यांना देण्यात आली होती त्यांनी ते काम नीट जबाबदारूनी पार पडले आहे का हे पाहणे गरजेचे होते ते त्यांनी पहिल्याचे दिसून येत नाही , काँग्रेस पक्ष कार्यालयात डिजिटल मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया चे पत्रकारांची नावे नोंद आहेत त्या सर्वांना त्यांनी निवडणुकीच्या काळात केलेल्या कामाचा मोबदला देण्यात आला आहे ? किती जणांना डावले , व का डावलले याची माहिती पक्षाने घ्यावी कारण या मुळे पक्षाचे नाव खराब होते म्हणून काम करत असताना कामांमध्ये प्रामाणिकपणा असावा पारदर्शकतापणा असावा कोणावरही अन्याय होऊ नये अशी भूमिका असावी
प्रिंट मीडिया , डिजिटल मिडिया मध्ये प्रचाराच्या नियमित प्रसिद्ध झालेल्या बातम्यांची कात्रणे यांचे रेकॉर्ड ठेवले आहे का हेही पक्षाकडून पाहण्यात यावे