शुक्रवारी या भागातील पाणीपुरवठा बंद राहील , तर भागात नियमित पाणी येणार आहे.

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : महानगरपालिकेकडून तातडीच्या देखभाल दुरूस्तीच्या कामासाठी येत्या शुक्रवारी ( दि.२४ रोजी) भामा- आसखेड जलकेंद्र वगळता शहरातील इतर सर्व भागांचा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.दुसऱ्या दिवशी सकाळी ( दि. २५) रोजी उशीराने आणि कमी दाबाने पाणी पुरवठा करण्यात येणार असून नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन महानगरपालिकेकडून करण्यात आले आहे.

या दिवशी पर्वती जलकेंद्र, वारजे जलकेंद्र, लष्कर जलकेंद्र, होळकर जलकेंद्र तसेच चिखली जलकेंद्र ( जागतिक पाणी योजना) याचा समावेश आहे. तर वडगाव जलशुद्धीकरण केंद्रा अंतर्गत येणारा सिंहगड रस्ता परिसर आणि भामा- आसखेड योजने अंतर्गत येणारा विश्रांतवाडी, नगररस्ता, कळस, धानोरी, विमाननगर, येरवडा या भागात नियमित पाणी येणार आहे.

पाणी पुरवठा बंद असणारा भाग :-

दक्षिण आणि मध्य पुणे

गुरुवार पेठ, बुधवार पेठ, काशेवडी, क्वार्टरगेट परिसर, गंज पेठ, भवानी पेठ, नाना पेठ, लोहिया नगर, सोमवार पेठ, अरुण वैद्य स्टेडीयम परिसर, घोरपडे पेठ, पर्वती दर्शन, मुकुंदनगर सहकार नगर, पद्मावती, बिबवेवाडी, मुकुंदनगर काही भाग, महर्षीनगर, गंगाधाम,

चिंतामणी नगर भाग-१ व २ लेक टाऊन, शिवतेजनगर, अप्पर इंदिरानगर, लोअर इंदिरानगर, शेळकेवस्ती महेश सोसायटी, बिबवेवाडी गावठाण, प्रेमनगर, आंबेडकरनगर डायस प्लॉट, ढोलेमळा, सॅलेसबरी पार्क, गरीधरभवन चौक, ठाकरे वसाहत, पर्वती परिसर दत्तवाडी परीसर, राजेंद्रनगर, लोकमान्य नगर, डेक्कन परिसर, शिवाजी नगर परिसर, स्वारगेट परिसर. नर्हे , तक्षशिला, दरोडे जोग, धायरी गावठाण, डिएसके विश्व, किरकटवाडी, नांदेड, खडकवासला.

पश्चिम पुणे

गोखलेनगर शिवाजीनगर, मॉडेल कॉलनी, रेव्हेन्यू कॉलनी, कोथरूड संपूर्ण भाग, वडार वस्ती, स्टेट बैंक कॉलनी, श्रमिक वसाहत, हॅपी कॉलनी, मेघदूत, तेजस नगर, डहाणूकर कॉलनी, सुतारदरा, किष्किंदा नगर, जयभवानी नगर, रामबाग कॉलनी, हनुमान नगर, केळेवाडी, गुजरात कॉलनी, गाढवे कॉलनी, ज्ञानेश्वर कॉलनी, आयडीयल कॉलनी, वडारवाडी, सेनापती बापट रोड, जनवाडी, वैदुवाडी, भोसले नगर, अशोकनगर, खैरेवाडी, शिवाजी हौ. सोसायटी,

भांडारकर रोड, प्रभात रोड, सेनापती बापट रोड, हनुमाननगर, जनवाडी, वैदुवाडी, वडारवाडी, पोलीस लाईन, संगमवाडी. गोखलेनगर, औध, बोपोडी, पुणे विद्यापिठ, सेनापती बापट रोड, भांडारकर रोड, प्रभात रोड, भूगाव रोड परिसर, कोकाटे वस्ती, सेंटीन हिल सोसायटी, मधुवन सोसायटी, संपूर्ण बावधन परिसर, उजवी भुसारी कॉलनी व डावी भुसारी कॉलनी व चढावरील भाग, चिंतामणी सोसायटी, गुरुगणेश नगर, सुरज नगर, सागर कॉलनी, भारतीनगर, बावधन परिसर,सुस रस्ता परिसर , संपूर्ण कर्वेनगर परिसर बाणेर, बालेवाडी, बाणेर गावठाण

पूर्व पुणे परिसर

संपुर्ण रामटेकडी इंडस्ट्रीयल एरिया, सय्यद नगर, हेवन पार्क, गोसावी वस्ती शंकर मठ, वैदूवाडी, राम नगर, आनंद नगर, हडपसर गावठाण, सातववाडी, गोधळे नगर, ससाणे नगर, काळेपडळ, मुंढवा, माळवाडी, सोलापूर रोड डावी बाजू आणि परिसर, केशवनगर मांजरी बु., शेवाळेवाडी, बी.टी. कवडे रोड,खराडी गावठाण, आपले घर, तुळजाभवानी नगर, ईऑन परीसर, चौधरी वस्ती,

सातव वस्ती, थिटे वस्ती, तुकाराम नगर, यशवंत नगर, चंदन नगर, कॅम्प, ससून. मुळा रोड, खडकी कॅन्टॉनमेंट संपूर्ण परिसरगणेशनगर, म्हस्के वस्ती, विश्रांतवाडी, विमाननगर, संजय पार्क, खराड़ी, कळस, बरमाशेळ, राजीव गांधी नगर, यमुना नगर, दिनकर पठारे वस्ती, ठुबे पठारे नगर आणि परिसर.

Post a Comment

Previous Post Next Post