आझम कॅम्पस मध्ये महाराष्ट्र दिनी ध्वजारोहण

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी(आझम कॅम्पस)मध्ये १ मे रोजी  महाराष्ट्र दिनानिमित्त सकाळी ९ वाजता ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.संस्थेचे अध्यक्ष  तसेच डॉ.पी.ए.इनामदार युनिव्हर्सिटीचे  कुलपती डॉ.पी.ए.इनामदार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.


संस्थेचे सचिव इरफान शेख, डॉ.एन.वाय.काझी,डॉ.नाझिम शेख, मशकुर शेख,साबीर शेख,एड.हनिफ शेख महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी,हाजी गुलाम महमद आझम एज्युकेशन ट्रस्टचे  पदाधिकारी, विश्वस्त, पदाधिकारी, प्राचार्य, शिक्षक,कर्मचारी उपस्थित होते.डॉ.पी.ए.इनामदार यांनी महाराष्ट्र दिन,कामगार दिनामागची पार्श्वभूमी सांगून सर्वांच्या प्रगतीत योगदान देण्याचे आवाहन केले.







Post a Comment

Previous Post Next Post