प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील पाच अधिकारी रोज दुपारी जेवणाच्या वेळेनंतर किमान पाऊन तास वॉकिंग करीत असतात व गप्पा मारीत असतात. हे सर्व अधिकारी उपकुलसचिव, वित्त अधिकारी दर्जाचे आहेत . या संदर्भात एका नागरिकाने कुलगुरू व कुलसचिव यांना तक्रार दाखल केली. या तक्रारी सोबत त्या अधिकाऱ्यांचे फोटो देखील सादर केले
यानंतर माहिती अधिकारांमध्ये याविषयी माहिती विचारली. परंतु त्याची उत्तरे अद्यापही दिली गेलेली नाही. कार्यालयीन वेळेव्यतिरिक्त विनाकारण फिरणाऱ्या या फिराडू अधिकाऱ्यांवर कारवाई का नाही?
Tags
पुणे