प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : दहावी परीक्षेत महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या अँग्लो उर्दू गर्ल्स हायस्कूल,अँग्लो उर्दू बॉईज स्कूल या शाळांचा निकाल शंभर टक्के लागला.एमसीईएस इंग्लिश मिडीयम स्कूल या तिसऱ्या शाळेचा निकाल ९८.४८ टक्के लागला.येथील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले.
अँग्लो उर्दू गर्ल्स हायस्कूल मध्ये उझमा असद खान ही विद्यार्थिनी ९५.४० टक्के गुण मिळवून प्रथम आली.अँग्लो उर्दू बॉईज हायस्कूलच्या उर्दू माध्यमात शाहबुद्दीन सलीम हावरे हा विद्यार्थी ८७.८० टक्के गुण मिळवून प्रथम आला.इंग्रजी माध्यमात शेख फहद शमिम हा विद्यार्थी ९३ टक्के गुण मिळवून प्रथम आला.एमसीईएस इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शेख अलिशा शफिक ही विद्यार्थीनी ९० टक्के गुण मिळवून प्रथम आली.
महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ.पी.ए.इनामदार,उपाध्यक्ष आबेदा इनामदार,सचिव प्रा.इरफान शेख,अँग्लो उर्दू गर्ल्स हायस्कूलच्या मुख्याध्यापिका रोशन आरा शेख,अँग्लो उर्दू बॉईज हायस्कूलच्या मुख्याध्यापक राज मुजावर,एमसीईएस इंग्लिश मिडीयम स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ.असफिया अन्सारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.