आम आदमी पार्टीच्या वतीने पुण्याचे जिल्हाधिकारी यांना निवेदन
प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : आम आदमी पार्टीच्या वतीने पुण्याचे जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले पुणे शहरांमध्ये गॅस सिलेंडर चा काळाबाजार होत असून गॅस चोरीचे प्रमाण वाढले आहे. आम आदमी पार्टीच्या वतीने पुणे जिल्हा अधिकारी यांनी व्यक्तिगत लक्ष घालावं असं विनंती निवेदन जिल्हाधिकारी यांना सादर केले आहे .
सदर निवेदना मध्ये पुणे शहरांमधील गॅस एजन्सी मध्ये गॅसची तसेच गोडाऊनची तपासणी करण्याची विनंती निवेदनात करण्यात आली आहे.
अगोदरच प्रचंड प्रमाणात मोदी सरकारने महागाई करून ठेवली आहे. आणि लोकसभेच्या तोंडावर गॅस चे दर शंभर , दीडशे रुपयाने कमी केले होते. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून दर कमी करण्याचे व निवडणुका झाल्यानंतर वाढवण्याचे महापाप हे केंद्रात बसलेल्या सरकार करत आहे. भाजप सरकारला जनता हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही. असे मत आदमी पार्टी पुणे शहर अध्यक्ष धनंजय बेनकर यांनी व्यक्त केले.
गॅस ची चोरी करणारी टोळी ही पूर्ण पुणे शहरात आहे. मागे विमाननगर येथे यातूंच स्फोट घडल्याची घटना आहे. घरगुती गॅस मधून गॅस काढून व्यवसायिक गॅस मध्ये भरतात व सर्व हातगाडीवाले यांना वितरीत केले जातात.संबंधित गॅस एजेंसी ने गॅस वजन करूनच दिला पाहिजे अन्यथा यावर आम आदमी पक्ष शहरभर गॅस एजेंसी वर हल्लाबोल आंदोलन करण्याचा इशारा, युवा शहर अध्यक्ष अमित म्हस्के यांनी दिला,
महागाईने हैराण झालेली जनता गॅसच्या कळ्या बाजाराने व दरवाढीने त्रस्त झाले असून यंदाच्या लोकसभेच्या निवडणुकी मध्ये रंगा बिल्लाचे सरकार पाडल्याशिवाय राहणार नाही व येणाऱ्या विधानसभे मध्ये एक फुल दो माली हे सरकार पाडल्याशिवाय राहणार नाही , बस हो गई महंगाई के मार असे म्हणत जनता धडा शिकवेल, मीडिया सहसंयोजक निरंजन अडागळे.
२०१४ साली भाजपचे सरकार सत्तेत आल्या पासून महागाईने मुंडके वर काढले आहे आणि जनतेचे कंबरडे मोडले आहे. गॅस च्या वाढलेल्या दरानी त्यात अधिकची भर पडली आहे.जनतेच्या मनात या सरकार विषयी मोठा रोष आहे. जनता त्यांना हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही.
महासचिव , अक्षय शिंदे ,सतीश यादव
प्रभाकर कोंढाळकर, प्रशांत कांबळे
कळावे,
पुणे शहर
मीडिया टीम