कात्रज तलाव बनत आहे मृत्यूचा सापळा-आशिष भोसले सदस्य, स्वराज्य पक्ष


प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे  : माझ्या भागातील हा ऐतिहासिक वारसा लाभलेला नानासाहेब पेशवे तलाव कात्रज याठिकाणी वारंवार आघात निर्माण झाले आहेत तलावामध्ये मागील  दरमहिना ४-५ प्रकार सातत्याने हे घडत आहे,महादेव नगर, शेलार माळा, गुजरनिंबाळकर वाडी या कात्रजच्या वाड्या वस्तीमधील लोकांना कात्रज गाव जिथे शालेय मार्गासाठी ह्या पुलावरून मार्ग आहे सातत्याने रहदारी ह्या पुलावरून असते  अनेक लहान विद्यार्थी या पुलावरून प्रवास करत आहे पावसाळ्यात पाणी दरवर्षी ओव्हरफ्लो होत आत्महत्या  तसेच अन्य प्रकारातून तलावामध्ये अपघाताचे प्रमाण खूप आहे या तलावावरील असणाऱ्या पुलावर कोणत्याही प्रकारची सुरक्षा जाळी नाही आम्ही अनेक संबंधित व्यक्तींना पुलाच्या बॅरिकेट पासून १५ फूट उंचीची जाळी बसवून द्यावी अशी मागणी केली पण प्रशासकीय अधिकाऱ्यांना अजून किती जीव गेल्यावर जाग येणार आहे ठाऊक नाही? तलावात जायला बंदी असताना आज मुलगा तिथे गेलाच कसा आणि तलावाला सुरक्षारक्षक आहेत मंग ते काय करत होते या तलावाच्या सुरक्षाव्यवस्थेचा प्रश्न  गंभीर आहे. कमी सुरक्षा रक्षक, तलावाला संरक्षक जाळ्या नसणे, याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

वारंवार पत्रव्यवहार करून उपयोग नाही तलावात पोहण्याला बंदी  असताना, मुलगा आत गेला कसा? यासाठी पुणे मनपा प्रशासन, लोकप्रतिनिधींनी अवश्य लक्ष घालावे. वृत्तपत्र प्रतिनिधी, माध्यमांनी याला प्रसिद्धि द्यावी , ही नम्र विनंती   अन्यथा आम्हाला ठिय्या आंदोलन करण्याशिवाय पर्याय नाही.

आशिष भोसले
सदस्य, स्वराज्य पक्ष

Post a Comment

Previous Post Next Post