प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे - नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा अकरा वर्षानंतर आज निकाल लागला असून यातील पाच पैकी सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना जन्मठेपेची शिक्षा झाली असून विरेंद्र तावडे ,संजीव पुनाळकर आणि विक्रम भावे यांची निर्दॉष मुक्तता झाली आहे.
अधिक माहिती अशी की,नरेंद्र दाभोलकर यांची दि.20/08/2013 साली पुण्यात दिवसा ढ़वळ्या गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती.या प्रकरणात एकूण पाच आरोपी होते.यातील सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांनी गोळीबार केल्याने न्यायालयाने या दोघांना दोषी ठरवून त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.आणि उर्वरीत तिघांना हत्येचा कट रचल्याचा आरोप होता.पण त्यांच्या विरोधात पुरावे नसल्याने न्यायालयाने यांची निर्दॉष मुक्तता करण्यात आली आहे.या आरोपीनी हत्या केल्याचा गुन्हा कबूल करण्यास नकार दिला होता.या खटल्याची सुनावणी न्यायाधिश श्री.एस .आर.नांवदर यांच्या कोर्टात चालू होती.त्यांच्या बदली नंतर विशेष न्यायाधिश पी.पी.जाधव यांच्या कोर्टात सुनावणी पूर्ण झाली.या खटल्यात एकूण वीस साक्षीदारांच्या साक्षी झाल्या असून या खटल्यात सरकारच्या बाजूने Ad.प्रकाश सुर्यवंशी यांनी काम पाहिले.तर बचाव पक्षातर्फे Ad.विरेद्र इंचलकरंजीकर ,Ad. सुवर्णा आव्हाड आणि Ad. प्रकाश साळशिंगीकर यांनी बचाव केला.