प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : अक्सा चॅरिटेबल ट्रस्ट संचलित नॅशनल पब्लिक स्कुल ( जाधवनगर,कात्रज)चा निकाल दहावी(शालांत) परीक्षेत शंभर टक्के लागला असून सर्व विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण होऊन घवघवीत यश मिळवले आहे.सलग पाचव्या वर्षी नॅशनल पब्लिक स्कुल चा निकाल शंभर टक्के लागला आहे.
प्रसाद सिद्धाराम पागा या विद्यार्थ्याने ८८ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. रितेश संजय वर्मा ने ८५.४० टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक पटकावला.मुख्याध्यापक सौ.अंजुम फिरदौस पटेल, संस्थापक ऍडव्होकेट तारिक अन्वर पटेल,सर्व संचालक,शिक्षक वर्गाने यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.'अक्सा चॅरिटेबल ट्रस्ट ही अल्पसंख्यांक शिक्षण कायद्याखाली नोंद झालेली शिक्षण संस्था असून गरीब,सर्वसाधारण कुटुंबातील विद्यार्थी येथे शिकतात.अभ्यासाबरोबर त्यांच्या सर्वांगीण विकासाचे उपक्रम वर्षभर आयोजित केले जातात',असे संस्थापक ऍडव्होकेट पटेल यांनी सांगितले.