भाजप व प्रशासनने क्रीडा क्षेत्राकडे दुर्लक्ष केले - शरद पवार

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : अलीकडच्या काळात भाजप व प्रशासनने क्रीडा क्षेत्राकडे दुर्लक्ष केले आहे. क्रीडा क्षेत्रातील विविध प्रकारच्या खेळाडूंना सोयीसुविधा नसल्याने त्यांचे कष्ट वाया जात आहे.  त्यामळे महाराष्ट्र मागे येत आहे. क्रीडा क्षेत्राला सोयीसुविधा देण्यासाठी तसेच अधिक प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही सातत्याने पर्यंत केले आहेत. यापुढील काळातदेखील खेळाडूंचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही  काम करणार आहोत. त्यांना न्याय देणे आमचे प्राधान्य असणार आहे, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी खेळाडूंना बोलतांना व्यक्त केला.

       महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी 'थेट सवांद खेळाडूंशी' कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. इंडिया आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर, माजी क्रीडा मंत्री सुनील केदार, माजी खासदार ऍड वंदना चव्हाण, महाराष्ट्र कुस्ती परिषदेचे सचिव बाळासाहेब लांडगे, काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, आपचे शहराध्यक्ष सुदर्शन जगदाळे, अंकुश काकडे,  काँग्रेसचे जेष्ठ नेते अभय छाजेड, माजी नगरसेवक अविनाश बागवे, महाराष्ट्र कुस्ती परिषदेचे सचिव बाळासाहेब लांडगे, अर्जुन पुरस्कार विजेत्या शकुंतला खटावकर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या स्मिता गोरे यांच्यासह अर्जुन पुरस्कार विजेते, छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार विजेते, कुस्तीगीर, आजी माजी क्रीडा संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

    पवार म्हणाले, राज्यात खेळाडूंना सोयीसुविधा देण्यासाठी आम्ही सातत्याने काम करीत आहे. मात्र भाजपाच्या काळात राज्यातील खेळाडूंना संपवण्याचा घाट सुरू आहे, असे खेळाडूंच्या तक्रारींतून दिसून येत आहे. त्यांना न्याय देण्यासाठी एकत्र येऊन काम करावे लागणार आहे. 

     70 वर्षावरील व्यक्तींनी खेळाच्या संदर्भात काम करायचे नाही असा कायदा केंद्र सरकारने केला. खेळाडुं घडवण्याचे काम करणे त्यांनी थांबवले . खेळाडूला अधिक सुविधा कशा देता येतील, खेळाचे आयोजन-प्रशासनने केले पाहिजे . खेळांमध्ये  प्रशासनाने राजकारण आणू नका. 

 पुणे महापालिका  क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देणारी म्हणून नावलौकिक आहे.  येथे मैदाने आहेत,पण ते वापरु शकत नाही.  त्यासाठी नियम व अटी ठेवल्या आहेत मग त्याचा उपयोग काय? असा सवाल यावेळी पवार यांनी उपस्थित केला. पुण्यात  खेळाडूंना न्याय भेटत नसेल तर आपल्याला त्यांचा नक्कीच विचार करावा लागणार आहे.

      पंजाब आणि हरियाणा मध्ये खेळाडूंना मिळणाऱ्या सुविधा आपल्या राज्यात देखील मिळाल्या पाहिजेत. खेळाडूंच्या समस्या सोडवण्यासाठी राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना  केंद्राकडून काही मार्गदर्शक सूचना द्यावा लागतील. सरकार कुणाचेही येऊ द्या, खेळाडूंना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. 

 खेळाडूंना खर्च खुप व मेहनत खुप करावी लागते. त्यांना प्रशासन व केंद्र व राज्य सरकारने न्याय दिला पाहिजे, असेही यावेळी पवार यांनी सांगितले.

  रवींद्र धंगेकर म्हणाले, शरद पवार यांचे क्रीडाक्षेत्रात मोठे योगदान आहे. त्यांच्यासारखा वस्ताद  प्रश्न सोडवणारा व मार्गदर्शन करणारा आमच्याकडे आहे. राज्याचे क्रीडा वैभव पुन्हा प्राप्त करून देणार आहे. पुण्यातील क्रीडा क्षेत्र व खेळाडूंना न्याय मिळवून देण्यासाठी काम करणार आहे. पुण्यात क्रीडा प्रश्नांवर काम केले आहे.

सुनील केदार म्हणाले, पुण्यात आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ होण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. आमचे सरकार गेल्यामुळे ते काम थांबले. आता नागरिकांनी क्रीडा व खेळाडूंच्या बाजू मांडल्या पाहिजे. आपली भावी पिढी त्यातून घडणार आहे.

 सतीश देसाई म्हणाले, बालेवाडी स्टेडियम मध्ये खेळाडूंना खेळाडूंना चांगली वागणूक मिळत नाही. सणस मैदानावरील वसतिगृहात खेळाडूंना मिळत नाही. त्यांना पूर्वीसारखे प्रोत्साहन मिळत नाही.

  शकुंतला खटावकर म्हणाल्या, महिलांना संधी कमी दिली जाते. राज्यात ठिकठिकाणी स्वतंत्र अकॅडमी स्थापन केली पाहिजे. आदिवासी भागात प्रशिक्षण नसल्याने राज्यभरात क्रीडा अकॅडमी सुरू करणे गरजेचे आहे, त्यानंतर आपल्याला ऑलम्पिक खेळाडू मिळतील. 

रोहन मोरे म्हणाले, गेल्या दहा वर्षात खेळाडूंनी खूप सहन केले आहे. बालेवाडी हक्काने वापरायला मिळत होते, पण 10 वर्षात बदल झाला आहे. आता बालेवाडीत पाहिले पैसे भरावे लागतात. उच्च दर्जाची पायाभूत सुविधा आहे, पण ते वापरता येत नाही. पुण्याच्या अवतीभवती क्रीडांगणे केली पण त्याची सध्या दुर्दशा झाली आहे. खेळाडूंवर प्रेम होते पहिले आता ते दिसत नाही. 

कुस्तीपटू म्हणाला, आम्हाला जास्त काही पाहिजे नसतं, एक मैदान पाहिजे आणि एक वस्ताद पाहिजे तुमच्या सारखा. या वाक्यावर खेळाडूंनी टाळ्या वाजवून दाद दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऍड अभय छाजेड यांनी केले. अरविंद शिंदे यांनी मानले.

Post a Comment

Previous Post Next Post