प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे लोकसभा मतदारसंघात पुणे कॅन्टोनमेंट-वानवडी भागात महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे उमेदवार आमदार रवींद्र धंगेकर यांच्या जीपयात्रा/पदयात्रेला नागरिकांचा फार मोठा प्रतिसाद मिळाला. भैरोबा नाला येथे श्री भैरोबाचे दर्शन घेऊन सकाळी सुरु झालेली पदयात्रा तब्बल पाच तास चालली. विशेष म्हणजे या पदयात्रेत माजी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम आणि माजी मंत्री सुनिल केदार हेदेखील सहभागी झाले होते.
ढोल-ताशा, पताके, सर्व पक्षांचे झेंडे, हाताच्या पंजाचे प्लेकार्ड आणि घोषणा यामुळे निवडणुकीचे वातावरण तयार झाले होते. ठिकठिकाणी नागरिकांनी धंगेकरांचे स्वागत केले. अनेक ठिकाणी औक्षण केले गेले.
या भागात मोठ्या सोसायट्या खूप आहेत. याचा उल्लेख करून आमदार रवींद्र धंगेकर म्हणाले की, “या भागातील सोसायट्यांचे आणि ट्रॅफिकचे मोठे प्रश्न आहेत. रस्ते छोटे आणि वाहने जास्त! त्यामुळे निर्माण झालेले प्रश्न सोडवण्यासाठी निवडणुकीनंतर विशेष ‘अॅक्शन प्लॅन’ तयार करून त्यात स्थानिक नागरिकांचाही सहभाग घेत प्रश्न सोडविण्यासाठी मी प्रयत्न करेन”. त्यांच्या या आश्वासनावर सोसायट्यांमधील नागरिकांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
या पदयात्रेत कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, आम आदमी पार्टी यांचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक सहभागी झाले होते. काही ठिकाणी अरुंद रस्ते असल्यामुळे राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या स्कूटरच्या मागे बसून आमदार रवींद्र धंगेकर यांनी सर्व परिसरात फिरून नागरिकांच्या भेटी घेतल्या. मार्गावरील मंदिरांमध्ये त्यांनी दर्शन घेतले तसेच चर्चमध्ये आशीर्वाद घेतले. केदारी पेट्रोल पंप येथे उमेदवार आमदार रवींद्र धंगेकर यांना माजी मंत्री सुनिल केदार , माजी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, शिवाजी केदारी आणि साहिल केदारी यांनी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.
भैरोबा नाला येथून सुरु झालेली पदयात्रा फातिमा कॉन्व्हेंट, महात्मा फुले सांस्कृतिक भवन, प्रशांत जगताप यांचे जनसंपर्क कार्यालय, संविधान चौक, केदारी नगर, साहिल केदारी यांचे जनसंपर्क कार्यालय मार्गे नेताजी नगर येथे समाप्त झाली.
या पदयात्रेत काँग्रेसचे माजीमंत्री सुनिल केदार, माजी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, शिवाजी केदारी, साहिल केदारी, सुनाम जांभूळकर, मिलिंद अहिरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, रत्नप्रभाताई जगताप, प्रफुल्ल जांभूळकर, केविन मॅन्युअल, प्रीती चढ्ढा, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे रमेश सोनावणे, ओंकार जगताप, रवींद्र जांभूळकर, वेदांत नांगरे, आरपीआयच्या प्रियदर्शनी निकाळजे आदी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
अरविंद शिंदे अध्यक्ष,
पुणे शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटी
९८२२०२०००५