प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे शहर लोकसभा मतदार संघांत, प्रती विधानसभा काँग्रेस आमदारांची निरीक्षक पदी नियुक्ती करण्यात आल्याची माहीती काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी आज पत्रकार परीषदेत दिली..
पुणे शहर लोकसभा मतदार संघात येणाऱ्या ६ ही विधान सभा मतदार संघात काँग्रेस आमदार प्रचार कार्याचा आढावा घेतील तसेच मित्र पक्ष व काँग्रेस चे पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये समन्वय साधून, आवश्यक ते सहकार्य व मार्गदर्शन करतील व पक्षश्रेष्ठींना तसा अहवाल सादर करतील असे काँग्रेस प्रदेश प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी सांगितले.
पुणे शहर लोकसभेचा काँग्रेस ऊमेदवार निवडणुक जिंकण्याचे सर्व्हे रिपोर्ट मिळत असल्याने काही दगा - फटका वा असंवैधानिक गैरकृत्ये होऊ नयेत या करीताच काँग्रेस पक्ष श्रेष्ठीं, मा प्रभारी श्री रमेशजी चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सदर आमदारांना निवडणुक काळात मतदार संघ निहाय जबाबदारी दिली असल्याची माहीती प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी दिली ..!
टिपः
सोबत निरीक्षक आमदार नियुक्तीचे पत्र जोडले आहे..!
मुख्य समन्वयक - डॅा विश्वजीत कदम
मतदार संघनिहाय निरीक्षक -
२०८ वडगाव शेरी; आ विकास ठाकरे
२०९ शिवाजी नगर; आ धिरज लिंगाडे
२१० कोथरूड; आ अभिजीत वंजारी
२१२ पर्वती; आ अमित झनक
२१४ पुणे कँन्टोंन्मेंट; आ राजूबाबा आवळे
२१५ कसबा पेठ; आ सुभाष धोटे